मुंबई, 3 डिसेंबर (आ.प्र.) :
सीएसआयआर ‘नीरी'चे संचालक डॉ. अतुल नारायण वैद्य यांची नागपूरच्या लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (एलआयटी) कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी डॉ. वैद्य यांची नियुक्ती जाहीर केली असून, डॉ. वैद्य यांनी रसायन अभियांत्रिकी विषयात एलआयटी-नागपूर येथून एम.एस्सी; तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली आहे. 1990 पासून त्यांनी ‘नीरी'त कनिष्ठ वैज्ञानिक पदापासून संचालक पदापर्यंत काम पाहिले आहे. डॉ. वैद्य यांना संशोधन, अध्यापन व प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे.