ते सूक्ष्म प्रकृति काेडें । जैं स्थूळाचिया आंगा घडे। तैं भूतसृष्टीची पडे। टांकसाळ।। 7.22

30 Dec 2024 13:58:58
 

saint 
 
श्रीकृष्णांचा उपदेश ऐकून अर्जुनाचे मन बरेच तयार झाले आहे असे समजून भगवान त्याला आता ज्ञानविज्ञान समजावून सांगत आहेत.विज्ञान म्हणजे प्रपंचज्ञान.हे नाना पदार्थ, नाना गुणधर्म यांनी नटलेले आहे.ज्ञान प्राप्त झाले असता इतर जाणीव उरत नाही.
विचार स्थिरावताे.ज्ञान व विज्ञान यांचे रूप समजावून सांगितल्यावर अज्ञान म्हणजे काय तेही सांगितले आहे. प्रपंचाच्या ठिकाणी सत्यबुद्धी जाणणे म्हणजे अज्ञान हाेय. हे अज्ञान, विज्ञान गळून गेले की केवळ ज्ञानरूप शिल्लक राहते. या ज्ञानाचा अनुभव सांगता येण्यासारखा नसताे. ऐकून समजण्यासारखा नसताे.तरी या ज्ञानाचे रहस्य श्रीकृष्ण थाेडे प्रकट करीत आहेत. हे ज्ञान प्राप्त झाले की, मन निरिच्छ हाेते. हजाराे माणसांत एखादाच धैर्यवान मनुष्य अशा ज्ञानाची प्राप्ती करून घेताे.
 
हजाराे, लाखाे माणसांत परमेश्वराची प्राप्ती करून घेणारा एखादाच असताे. या ज्ञानाचे आणखी वर्णन करताना श्रीकृष्ण अष्टधा प्रकृतींचे विवेचन करतात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी व अहंकार असे आठ प्रकार प्रकृतीचे आहेत. या आठही प्रकृतींची साम्यावस्था म्हणजे अव्यक्त दशा असून तिला जीव असे नाव आहे.ही जड पदार्थ अस्तित्वात आणते. चैतन्याकडून क्रिया करविते. मनात शाेक व माेह निर्माण करते.अहंकाराच्या खेळाने ती सृष्टीला जन्म देते, तेव्हा एखादी टांकसाळ उघडली आहे व तीमधून भराभर नाणी बाहेर पडत आहेत असे वाटते.जारज, अंडज, स्वेदज व उद्भिज अशी चार प्रकारची सृष्टी आपाेआप निर्माण हाेते. वस्तूंचे अनेक प्रकार तयार हाेतात.
Powered By Sangraha 9.0