तरुणांनी स्टाईल करताना बेसिक काळजी घ्यावी

30 Dec 2024 13:34:24
 
 

young 
सध्या फॅशनचा जमाना आहे. आपले व्यक्तिमत्व आधिक देखणे आणि रुबाबदार दिसावे म्हणून आपण अनेक अ‍ॅक्सेसरीज वापरताे. त्यासंदर्भात विशेषतः तरुणांनी स्टाईल करताना बेसिक काय काळजी घेतली पाहिजे याबद्दलच्या टिप्स ः उंची कमी असल्यास ः बिल्ट-इन हील्स असलेले किंवा हाय काऊबाॅय बूट घालणे टाळा. त्यामुळे तुम्ही ार उंच दिसणार नाही. उलट आत्मविश्वासपूर्वक पावले टाकण्यात अडचण येईल. त्याचबराेबर आखूड पँट वापरू नका.पूर्ण बाह्यांचे शर्ट आणि ट्राऊजर वापरा. त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व उठावदार दिसेल.व्हर्टिकल पॅटर्न असलेले म्हणजे उभे लायनिंग असलेल्या डिझाईनचे शर्ट वापरा. स्ट्रेट लेग ट्राऊजर्स, जीन्स वापरा.टाय वापरायचा असल्यास जाडजूड रुंद टाय न वापरता कमी रुंदीचा, पातळ असा टाय निवडा.
 
उंच व्यक्तिमत्त्व: वरपासून खालपर्यंत मॅचिंग म्हणून एकाच रंगाचे कपडे वापरू नका पिनस्ट्रीप सुट किंवा व्हर्टिकल पॅटर्न टाळा. व्हर्टिकल पॅटर्नमुळे व्यक्तिमत्व रुबाबदार दिसण्यात अडथळे येतात. कमरेपर्यंत येणारी जॅकेट किंवा कमी रुंदीचे टाय वापरु नका.
लांब जॅकेट आणि डबल ब्रेस्टेड सुट शक्यताे टाळा. ट्रेंडी जीन्स आणि डार्क जीन्स शाेभून दिसतात.
 
वजनदार व्यक्तिमत्व: एक्स्ट्रा पॅडिंग असलेली जॅकेटस वापरू नका. त्यामुळे व्यक्तिमत्व आणखी ठसठशीत दिसू लागते. रुंद आणि लक्षवेधी रंगाचे टाय टाळा. ाॅर्मल शर्ट खरेदी करतान नेकसाईज पाहून घ्या. तुमच्या मजबूत मनगटावर कधीही पातळ बेल्टचे घड्याळ वापरु नका. लांब आणि जाडजूड स्वेटर टाळा. व्हर्टिकल पॅटर्नचे शर्ट आणि स्वेटर वापरा. नॅराे आणि ओपन काॅलरचे शर्ट निवडा. टाय वापरताना शक्यताे त्यावर एकच रंग असेल अशी निवड करा.
 
बेताची तब्येत असलेल्यांसाठी: व्ही-नेक शर्ट किंवा स्वेटर वापरु नका. त्याने तुमचे व्यक्तिमत्व आणखी बारीक दिसते. व्हर्टिकल स्ट्रीपचे शर्ट टाळा. टाईट िफटींगचे कपडे घातल्यास व्यक्तिमत्वातील त्रुटी सहजपणे समाेरच्याच्या नजेरत भरतात. त्यामुळे टाईट िफटींग टाळा.
Powered By Sangraha 9.0