अंतरिक्षात आतडे-यकृत काम करत नाहीत?

30 Dec 2024 13:05:30
 
 


Space 
 
नासाच्या आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्टेशन (आयएसएस) वर दीर्घकाळपर्यंत राहणाऱ्या प्रवाशांचे आतडे आणि लिव्हर आकुंचन पावू शकते. शास्त्रज्ञांनी एका नवीन संशाेधनात हा दावा केला आहे.शास्त्रज्ञांच्या सांगण्यानुसार अंतरिक्षात राहणाऱ्या प्रवाशांची आजारांशी लढण्याची क्षमता कमी हाेते. त्याचप्रमाणे पाचनश्नतीवरही परिणाम हाेताे. कॅनडाच्या मॅकगिल युनिव्हर्सिटीच्या संशाेधकांनी हे संशाेधन केले आहे.हे सांगितले पाहिजे की, सुनीता विल्यम्स मागील 90 दिवसांपासून अंतरिक्षात अडकलेल्या आहेत. अमेरिकी अंतरिक्ष एजन्सी नासाने सांगितले ते पुढच्या वर्षी फेब्रुवारी 2025च्या आधी पृथ्वीवर परत येऊ शकत नाहीत. अशा स्थितीत हा शाेध खूपच महत्त्वाचा आहे. ज्यामध्ये हा शाेध खूपच महत्त्वाचा आहे, ज्यात अंतरिक्षात जास्त काळ राहण्याचा परिणाम समाेर आला आहे.उंदरांवर शाेध संशाेधनाच्या दरम्यान संशाेधकांनी अनुवंशिक तंत्रज्ञानाचा वापर केला.
 
या दरम्यान त्यांनी आयएसएसवर तीन महिन्यांसाठी नेण्यात आलेल्या उंदरांवर संशाेधन केले. त्यांनी त्यांचे आतडे, काेलन आणि लिव्हरमध्ये हाेणाऱ्या परिवर्तनांवर लक्ष दिले. त्यांना आढळले की, आतड्यातील बॅ्नटेरियांमध्ये परिवर्तन झाले हाेते आणि लिव्हरमध्ये बदल दिसून आला. हे सुद्धा दिसून आले की, ते पुन्हा पुन्हा आजारी पडू लागले.त्यातून निष्कर्ष निघाला की, त्यांच्या इम्यून सिस्टीमवर परिणाम झाला. त्यामुळे ते शारीरिक दृष्टीने कमकुवत झाले.माेहिमेत मिळेल मदत ; संशाेधनातील परिणाम अंतरिक्ष यात्रेच्या दरम्यान सुरक्षा उपायांना विकसित करण्यासाठी सहकार्य करतील.हे भविष्यात चंद्र आणि मंगळावर मानवांना पाठविणाऱ्या माेहिमा यशस्वी करण्यास मदत करू शकते.
 
अंतरिक्षात राहताना शरीरावर हाेणारे परिणाम डाेकेदुखी आणि उलटी : अंतरिक्षात गुरुत्वाकर्षण कमी असल्याने अनेक लाेकांमध्ये स्पेस सिकनेसची लक्षणे दिसून येतात. म्हणजेच त्यांना डाेकेदुखी, मळमळ आणि उलटी येणे हे सुरू हाेते.
 
आतडे आकुंचित हाेणे : आतड्यातील बॅ्नटेरियांमध्ये बदल हाेणे आणि ते आकुंचन हाेण्याचा धाेका असताे. तसेच लिव्हरसुद्धा कमकुवत हाेते.
 
स्नायूंमध्ये बदल : गुरुत्त्वाकर्षणाच्या कमतरतेमुळे स्नायू कमकुवत हाेऊ शकतात.जास्त काळ तिथे राहिल्यास हाडांवर परिणाम हाेऊ शकताे.
 
दिसण्यात अडथळा येणे : जास्त काळपर्यंत अंतरिक्षात राहिल्याने न्यूराे ऑ्नयूलर सिंड्राेमचा धाेका हाेऊ शकताे. त्यामध्ये डाेळ्यांच्या नसांवर दबाव पडताे आणि दिसणे कमी हाेते.
 
चेहरा सुजण्याचा धाेका : अंतरिक्षात राहताना र्नत आणि शरीरातील इतर पातळ पदार्थ शरीराच्या वरच्या भागात जमा हाेतात. त्यामुळे चेहरा सुजताे.
Powered By Sangraha 9.0