या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही धाडसाने काम कराल. नव्या कामात तुम्हाला यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती बळकट हाेईल. तुम्ही केलेल्या परिश्रमाची प्रशंसा हाेईल. जीवनात संतुलन राखण्यासाठी तुम्ही तुमचे ध्यान एकवटण्यावर भर द्यावा.
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात व्यवसाय व करिअरच्या माेर्चावर तुमच्या परिश्रमाचे चीज हाेईल. ऑफिसात तुमच्या वरिष्ठांकडून तुमच्या कामाची प्रशंसा हाेईल. व्यवसाय-व्यापारात धनप्राप्ती हाेण्याची श्नयता आहे. पण तुम्ही काेणतेही माेठे निर्णय घेणे सध्या टाळायला हवे.
नातीगाेती : नातेसंबंधांमध्ये सुधारणा हाेईल आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांसाेबत वेळ घालवण्याची संधी लाभेल. जीवनसाथीसाेबत एखादी राेमँटिक सहल आयाेजित करू शकता. त्यामुळे तुमच्यातील नाते जास्त मजबूत हाेईल. प्रेमींसाठी उत्साहवर्धक आठवडा.
आराेग्य : हा आठवडा तुमच्या आराेग्याच्या दृष्टीने लक्ष देत राहायला हवे असे सांगत आहे. विशेषत: पाेटाचा त्रास हाेण्याची श्नयता आहे. बाहेरचे खाणे तुम्ही टाळायला हवे. त्याचा परिणाम जास्त काळ राहणार नाही.तरतरीत राहण्यासाठी भरपूर पाणी प्यावे.
शुभदिनांक : 28, 31, 04
शुभरंग : गुलाबी, पिवळा, लाल
शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
दक्षता : या आठवड्यात आराेग्याबाबत दुर्लक्ष करू नये.
उपाय : राेज दुर्गाचालिसा वाचावी व हिरवे वस्त्र परिधान करावे.