तेव्हा पहिली गाेष्ट ही की, याेगाचा विशेष अभ्यास आहे.ताे अभ्यास म्हणजे श्नितस्राेत.आत जे सुप्त आहे ते जागे करणे.सजीव करणे. पुनर्जिवित करणे.बरेच स्राेत आहेत. कधीकधी घटना अचानक घडतात आणि मग कुठे लाेकांना पत्ता लागताे. स्वित्झर्लंडमध्ये एक माणूस रेल्वेतून खाली पडला. त्याच्या कानांना जबरदस्त ध्नका बसला. जेव्हा त्याला इस्पितळात नेण्यात आले तेव्हा असे दिसले की, तेथून दहा मैलाच्या अंतरात असलेल्या सर्व रेडिओ स्टेशन्सचे कार्यक्रम त्याचे कान पकडत आहेत.माेठी आश्चर्याची गाेष्ट झाली. माणसाच्या कानांची रेडिओ न वापरता रेडिओ स्टेशनच्या लहरी सरळ ग्रहण करण्याची क्षमता असेल, असे कधी वाटले नव्हते.
पण याेग पूर्वीपासूनच सांगत आहे की, मानवी कानांची अशीसुद्धा क्षमता असते. ती जागी मात्र करायला लागते. हे जे झाले ते अपघाताने झाले की माणूस गाडीतून पडल्याबराेबर बिंदूवर जाेर येऊन त्याला धक्का बसला, आणि ते चक्र सक्रिय झाले. हेच व्यवस्थितपणे, अपघात न हाेता, सक्रिय कसे करायचे ते याेगाला माहिती आहे.त्याच्याच काही दिवस आधी, स्वीडनमध्ये एका माणसाच्या डाेळ्याचे ऑपरेशन झाले, अन् त्याला अचानक दिवसासुद्धा आकाशातले तारे दिसू लागले.दिवसा आकाशातले तारे! तारे तर दिवसाच्या वेळीही आकाशात असतातच, सूर्याच्या प्रकाशामुळे ते दिसत नसतात, एवढेच. जर एखाद्या खाेल विहिरीत तारे दिसतात, पण त्या माणसाला तर, चक्क सूर्याच्या उन्हात उभे राहूनच आकाशातले तारे दिसू लागले.