दीर्घायुषी तारुण्य देणाऱ्या खाद्यपदार्थाने तंदुरुस्त राहा

30 Dec 2024 13:42:28
 
 

Health 
 
फळे : गडद रंगाच्या फळांमध्ये भरपूर प्रमाणात फ्लॅवाेनाइड्स व क जीवनसत्व असते. यामुळे रक्तवाहिन्यांचे व्हाॅल्व्ह मजबूत हाेतात व रक्ताभिसरण चांगले हाेते. गडद लाल रंगाच्या सफरचंदामुळे हृदयाला ायदा हाेताे.यातील तंतुंमुळे बद्धकाेष्ठता कमी हाेते.
 
धान्य : आहारात धान्य, डाळी, तांदूळ असेल तर आतडी निराेगी राहतात. माेडाची धानये जास्त उपयुक्त आहेत.
 
सलाद : जास्त मांसाहारामुळे हाेणाऱ्या अ‍ॅसिडिटीमुळे व हानिकारक घटकांच्या एकत्रिकरणामुळे सांधेदुखी वाढते. त्यावर सलाद हा उत्तम उपाय आहे.
 
पाणी : पेशी निराेगी राहण्यासाठी शरीराला पुरेसे पाणी हवे असते. राेज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे.
 
साेयाबीन : साेयाबीनमुळे शरीराची शक्ती वाढते. साेयाबीन तेल हृदयासाठी चांगले असते. स्त्रियांसाठी आवश्यक घटकही यामध्ये जास्त असतात. हे खूपच लवकर हामान्स रिप्लेसमेंट करतात.
 
तीळ : हाडे मजबूत व निराेगी राखण्यासाठी कॅल्शियमची गरज असते.कॅल्शियम, मॅग्नेशियम व झिंकचा भरपूर स्राेत तिळामध्ये असताे.
 
सेलेनियम : शरीराला ्री रेडिकल्सशी झुंजण्यासाठी ग्लुटा थिआन पॅराक्साइड या एन्झाइम्सची गरज असते. त्यामुळे कॅन्सर या हृदयराेगाची शक्यता कमी हाेते. सनफ्लाॅवर तेल, शेंगदाणे व साेयाबीन तेल सेलेनियमचे चांगले स्राेत आहेत.
 
लिव्हर : वृद्धत्व राेखण्यासाठी व्हिटॅमिन ए व झिंकची आवश्यमता असते. शरीरात हार्माेन्सची उणीव भरून काढण्यासाठी हे उपयुक्त असतात. लिव्हर हा यासाठी उत्तम स्राेत आहे. पर्यायी स्वरुपात लिव्हर गाेळ्या व सिरपही घेता येते.
 
ऑयली िफश : उतारवयात हृदयाचा झटका व दाेन स्ट्राेक हाेण्याची भीती असते. ऑयली िफशमध्ये असणारे ओमेगा-3 रक्त घट्ट हाेऊ देत नाही.
Powered By Sangraha 9.0