मिथुन

    30-Dec-2024
Total Views |
 

Horoscope 
 
हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक बदल घेऊन येत आहे. वैयक्तिक जीवनात काही आव्हानांना सामाेरे जावे लागू शकते पण तुम्ही तुमच्या प्रेमळ स्वभावाने ती आव्हाने सहज पार पाडू शकाल. फक्त थाेडा संयम बाळगायला हवा. कामकाजात प्रगती करण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत हाेईल.
 
 नाेकरी-व्यवसाय : तुमच्या कामांमध्ये अडथळे येण्याची श्नयता आहे.पण तुम्ही चातुर्याने त्यातून मार्ग काढू शकाल. नाेकरीत बदल करण्याचा विचार काही काळासाठी स्थगित करावा. बिझनेसमध्ये नवे संपर्क जाेडले जातील. पण काेणतीही माेठी गुंतवणूक तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावी.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या दांपत्यजीवनात थाेडी अशांती असेल. त्यामुळे तुम्ही संवाद साधताना थाेडा स्पष्टपणा राखायला हवा.तुमच्या प्रेमसंबंधात माधुर्य असणार आहे पण तुम्ही तुमच्या जाेडीदाराच्या भावना समजून घेण्याची गरज आहे. मुलांकडून शुभवार्ता समजेल.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुम्ही तुमच्या तब्बेतीची काळजी घ्यावी.अनियमित खाण्या-पिण्यामुळे पाेटासंबंधित समस्या हाेण्याची श्नयता आहे. त्या टाळण्यासाठी नित्यनेमाने समताेल आहार घ्यावा. जागरण टाळावे. तणावापासून दूर राहावे आणि नियमितपणे व्यायाम करावा. .
 
 शुभदिनांक : 29, 30, 03
 
 शुभरंग : हिरवा, निळा, क्रीम
 
 शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
 दक्षता : भावनावेगात वाहून काेणताही निर्णय घेऊ नये.
 
 उपाय : या आठवड्यात बुध ग्रहासाठी हिरवी वस्त्रे दान करावीत.