या आठवड्यात तुम्ही तुमच्या आर्थिक याेजनांवर जास्त लक्ष द्याल.नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तत्पर राहाल. तुम्ही तुमच्या कामांमध्ये नव्या याेजनांवर काम करण्यासाठी आशावादी राहाल. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल आणि त्यातून धनलाभही हाेईल.
नाेकरी-व्यवसाय : व्यवसाय व करिअरच्या माेर्चावर तुम्हाला काही आव्हानात्मक स्थितींचा सामना करावा लागू शकताे. पण तुम्ही धीर धरायला हवा. जरी व्यवसायात चढ-उतार जाणवत असले तरी तुम्हाला तुमच्या जुन्या प्राेजे्नट्समधून फायदा हाेईल. नवी गुंतवणूक टाळावी.
नातीगाेती : प्रेमसंबंधात संवादाचा अभाव राहिल्यामुळे दुरावा वाढण्याची श्नयता आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या कामातून वेळ काढून आपल्या प्रेमीसाेबत बाेलायला हवे. काहीसे हेच वैवाहिक मंडळींबाबतही झाल्यामुळे त्यांनीही जाेडीदाराशी संवाद साधायला हवा..
आराेग्य : हा आठवडा तुमच्या आराेग्याच्या दृष्टीने सावध राहायला हवे असे सांगत आहे. पण एखाद्या दुर्घटनेमुळे वा वाढत्या थंडीमुळे सांधे वा कंबरदुखीचा त्रास हाेण्याची श्नयता आहे. तसा त्याचा परिणाम जास्त काळ राहणार नाही. तरीही तुम्ही सुरक्षितपणे वाहन चालवावे.
शुभदिनांक : 29, 30, 03
शुभरंग : हिरवा, निळा, क्रीम
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात विनाकारण वाद घालणे टाळावे.
उपाय : हनुमान चालिसा वाचावी व कालीमातेची पूजा करावी.