पुणे, 2 डिसेंबर, (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
नुकत्याच अरुणकुमार वैद्य स्टेडियमवर पार पडलेल्या सकाळ स्कूलिंपिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेत 42 ते 44 किलो वजनी, 14 वर्षाखालील मुलांच्या गटात ज्ञानसंस्कार मीडियम स्कूल व क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे प्रतिष्ठानच्या कु. श्रेयस विश्वास शेवाळे याने अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला. त्याला प्रशिक्षक विजय गुजर सर, उमेश जगदाळे सर, डॉ. राहुल पाटील सर आणि अमोल सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. सध्या आठवीत शिकणाऱ्या श्रेयसला ज्ञानसंस्कार इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सुजाता पाठक, वर्गशिक्षिका सोनाली फारसे तसेच क्रीडाशिक्षक सोहम मारणे यांचे सहकार्य लाभले. श्रेयस हा अप्पा बळवंत चौक विभागातील ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते चंद्रकांतदादा शेवाळे यांचा नातू आहे.