नागालँड, आसाम स्थापना दिन राजभवनात उत्साहात साजरा

03 Dec 2024 19:05:15
 
 

nagaland 
 
राज्य स्थापनेपासून नागालँड व आसाम या राज्यांनी शिक्षण, आराेग्य, राेजगारनिर्मिती व पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. दाेन्ही राज्यांना निसर्गसंपदेचे वरदान लाभले आहे. देशातील राज्ये समजून घेण्यासाठी त्या-त्या राज्यांना प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे व तेथील संस्कृती लाेकांमध्ये राहून समजून घेतली पाहिजे.नागालँड व आसामला भेट देऊन तेथील लाेकांशी संवाद वाढवल्यास राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत हाेईल.नागरिकांनी या दाेन्ही राज्यांना भेट द्यावी, असे आवाहन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून राजभवनात राज्यपालांच्या उपस्थितीत नागालँड (1 डिसेंबर) व आसाम (2 डिसेंबर) राज्य स्थापना दिवस संयु्नतरित्या साजरा करण्यात आला.
 
त्यावेळी ते बाेलत हाेते. राजभवनातर्फे एसएनडीटी महिला विद्यापीठ व उत्तर पूर्व राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण व सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या ‘ईश्वरपुरम-पुणे’ या संस्थेच्या सहयाेगाने या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते.यावेळी ईश्वरपुरममधील नागालँड व अरुणाचल प्रदेशच्या विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध बांबू नृत्य सादर केले, तर एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी संथाली नृत्य व आसामी लाेकगीत सादर केले.एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्ज्वला चक्रदेव, प्र.कुलगुरू रुबी ओझा, ईश्वरपुरम संस्थेचे अध्यक्ष विनीत कुबेर, संस्थापक सदस्य प्रशांत जाेशी यांच्यासह उपस्थित विद्यार्थी व कलाकारांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0