संशाेधक : थाॅमस अल्वा एडिसन 12 ऑगस्ट, 1877 राेजी असा आविष्कार झाला, ज्याने जगाला कायमसाठी बदलले. थाॅमस अल्वा एडिसन यांनी त्या दिवशी एक असे उपकरण बनविले, ज्याने आवाज रेकाॅर्ड करणे आणि ताे पुन्हा ऐकण्याचे स्वप्न साकार केले. या उपकरणाचे नाव हाेते फाेनाेग्राफ. एडिसन टेलीग्राफ ट्रान्समीटर मध्ये सुधारणा करण्यासाठी काम करत हाेते. त्यांनी तेव्हा अजब घटना पाहिली. मशीनच्या टेपला वेगाने चालविल्यानंतर बाेलल्या गेलेल्या शब्दांसारखा आवाज येत हाेता. याने एडिसन यांना विचार करण्यास भाग पाडले की, ते टेलिफाेन संदेशांना रेकाॅर्ड करू शकतात का? शेवटी त्यांनी एक असे उपकरण तयार केले, जे ध्वनीला रेकाॅर्ड करू शकत हाेते. एडिसन यांनी टिनफाॅइल सिलेंडरवर एका स्टाइलसचा वापर केला आणि त्यांनी जे ऐकले ताे त्यांच्यासाठी जादुई अनुभव हाेता. त्यांनी एक लहानसे वा्नय रेकाॅर्ड केले, ‘मॅरीच्या जवळ एक लहान काेकरू हाेते.’ जेव्हा त्यांनी रेकाॅर्डिंगला पुन्हा चालविले, तेव्हा त्यांनी आपलाच आवाज ऐकला.