सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे आणि अनेक नवपरिणित जाेड्या आपले नवे जीवन सुरू करीत आहेत. लग्नाबाबत सर्वांची स्वप्ने असतात आणि या प्रसंगी लाखाे रुपये पाण्यासारखा खर्च करणे ही सामान्य गाेष्ट आहे. अशाप्रसंगी नवरा-नवरीचा आनंद लपू शकत नाही. या जाेड्या हिराे-हिराॅइनप्रमाणे तयार हाेत असतात.तरीही असे का हाेते की, अनेक लग्ने काही वर्षांतच माेडतात. एका डेटिंग साइडनुसार, आज खूप सारे असे पार्टनर आहेत ज्यांचे विवाहबाह्य संबंध आहेत. यात माेठ्या संख्येने महिलाही आहेत. याचे कारण नात्यात असमाधान असू शकते. डेटिंग वेबसाइट ्नवॅक- ्नवॅकनुसार एक काळ असा हाेता, जेव्हा भारतीय समाजात डायव्हाेर्ससारखा शब्द टॅबूप्रमाणे हाेता; पण आज असे राहिलेले नाही.
एका अंदाजानुसार सुमारे 100 पैकी 47 शहरी आणि 100 पैकी 40 ग्रामीण भागात महिला आपल्या लग्नामुळे नाखूश आहेत.मॅरेज काउंसलर डाॅ. जाॅन गाॅटमॅन यांच्या मते, माेठ्या संख्येत लग्नाशी संबंधित वादांचे कधी निवारणच हाेऊ शकत नाही. सुमारे तीन हजार मॅरिड कपल्सवर झालेल्या सर्व्हेत यांच्या न साेडवल्या गेलेल्या मुद्यांना डाॅ. गाॅटमॅन यांनी ‘ग्रिडलाॅ्नड’ नाव दिले. सायकॅट्रिस्ट डाॅ. रूमा भट्टाचार्य यांच्या मते, याचे एक माेठे कारण कम्युनिकेशनचा अभाव आहे. पती-पत्नी एकत्र बसून अनेक मुद्दे सहजतेने साेडवू शकतात. कित्येकदा तर अनेक गुंत्यांचे मुद्दे प्रत्यक्षात तसे नसतातच. त्यामुळे परस्पर सामंजस्याने आपले वाद साेडवणे उत्तम ठरेल.