पन्नाशीनंतर स्वतःमध्ये काेणते बदल करावेत?

    03-Dec-2024
Total Views |
 

Health 
 
पन्नाशीनंतर याेग्य सवयी ठेवल्या, तर तुम्ही पुढच्या आयुष्यात मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या बळकट राहू शकता.पन्नाशी गाठल्यावर प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक भावनिक आणि शारीरिक बदल घडत असतात. तुम्ही आयुष्याबद्दल समाधानी असता आणि त्याचबराेबर नाविन्याचा शाेध घेण्याची उर्मीदेखील निर्माण झालेली असते. याच वयात याेग्य सवयी लावून घेतल्या तर भविष्यात आणखी चांगल्या प्रकारे आयुष्य जगता येते. पन्नाशीनंतर काय आणि कसा विचार केला पाहिजे याविषयी...
 
बदल स्वीकारा: जीवनाच्या या टप्प्यावर शरीरात अनेक बदल हाेत असतात. हार्माेन्सचे असंतुलन, स्त्रियांच्या बाबतीत पाळी बंद हाेणे, त्यातून मग वजन वाढणे किंवा कमी हाेणे. हे बदल स्वीकारणे हाच या टप्प्यावरील उपाय असताे. त्यातून याेग्य प्रकारे तंदुरुस्त राहण्यासाठी मदत हाेते.
 
आराेग्यदायी आणि संतुलित आहार:पन्नाशीच्या टप्प्यावर साखर आणि कार्बाे हायड्रेटस्च्या सेवनावर नियंत्रण ठेवा.फळे आणि भरपूर भाज्यांचा समावेश असलेला आहार सेवनाचे नियाेजन करा.दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक असलेले कॅल्शियम मिळत राहते. कॅल्शियममुळे तुमची हाडे दीर्घकाळासाठी मजबूत राहतात.साधारणपणे पन्नाशीनंतर हाडांची दुखणी सुरु हाेतात. आहारातून कॅल्शियमचा पुरेसा पुरवठा झाल्यास सांधेदुखी, पाठदुखी असे आजार हाेणार नाहीत आणि कॅल्शियमच्या गाेळ्या खाण्याची वेळ येणार नाही.
 
नियमित तपासण्या करून घ्या: पन्नाशीनंतर दर सहा महिन्यांनी सर्वसाधारण तपासण्या नियमितपणे करून घेणे श्रेयस्कर ठरते. ईसीजी, रक्त्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब तसेच काेलेस्टेराॅलचे प्रमाण इत्यादी बाबी तपासून घ्या. त्यामुळे एखाद्या व्याधीचे वेळीच निदान हाेते आणि त्याची व्याप्ती वाढण्यापूर्वीच उपचार करून घेणे शक्य हाेते.
 
आर्थिक व्यवस्थापन: पन्नाशीत याेग्य आर्थिक व्यवस्थापन केले तर भविष्यात त्यातून चांगला परतावा मिळू शकताे. जर तुम्ही काहीच नियाेजन केले नसेल तर नियाेजनाला सुरूवात करा. म्युच्युअल ंड, शेअर बाजाराचा अभ्यास करा आणि याेग्य ठिकाणी गुंतवणूक करा. गुंतवणुकीची नुसती चर्चा करत बसण्यापेक्षा गुंतवणूक करा. बदलत्या काळात वयाेमानानुसार आपल्यालाच स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे आणि त्यासाठी चार पैसे गाठीला असले पाहिजेत याची जाणीव ठेवा. सध्याच्या जमान्यात आर्थिक स्वातंत्र्य हे मह्त्त्वाचे ठरते आणि पन्नाशीनंतरच्या आयुष्यात तर त्याचे महत्त्व अधिकच आहे.
 
सकारात्मक रहा: तुम्ही आयुष्यात जे काही कमावले आहे, कमावत आहात त्याविषयी सकारात्मक रहा. काही अनपेक्षित घटना-घडामाेडींमुळे ताण किंवा नैराश्य येऊ शकते. पुढील आयुष्यात काेणत्याही प्रसंगाला सकारात्मकतेने सामाेरे जाण्याची तयारी ठेवा. सकारात्मक रहा आणि चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवा.इच्छाशक्तीने अनेक गाेष्टी शक्य हाेतात.तेव्हा तीव्र इच्छाशक्ती ठेवा