संसदेचे अधिवेशन सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबीयांना भेटीसाठी वेळ देत त्यांच्याशी आपुलकीने चक्क मराठीतून संवाद साधला. पंतप्रधानांनी विचारपूस केल्याने मोहोळ कुटुंबीय अगदी हरखून गेले. या प्रसंगी मोहोळ यांच्यासमवेत त्यांच्या मातोश्री, पत्नी मोनिका, ज्येष्ठ बंधू प्रभाकर, कन्या सिद्धी आणि सौम्या आदी उपस्थित होते.