काॅफीचे अतिसेवन हानिकारक

02 Dec 2024 19:08:39
 
 
 

coffee 
अति काॅफीमुळे शरीरात उत्साह निर्माण हाेत असला आणि उष्णता प्राप्त हाेत असली तरी त्यामधील चिवटपणा व कडूपणा याच्या दुष्परिणामामुळे उष्णतेचे विकार जडतात. हातापायांची, डाेळ्यांची आग हाेणे, निद्रानाश, छातीत धडधडणे, पित्ताचे विकार वाढणे, वंध्यत्व निर्माण हाेणे असे अनेक विकार जडतात.उष्ण प्रदेशातील लाेकांनी काॅफीचे सेवन अजिबात करू नये. तसेच इतरांनीही राेजच काॅफी सेवन करू नये. काॅफी पेय तयार करताना त्यात साखर मिसळतात. त्यामुळे काॅफी शरीरास अजूनच घातक ठरते. काॅफी व साखरेच्या दुष्परिणामामुळे लठ्ठपणा, हृदराेग, अति रक्तदाब, कॅल्शिअमची कमतरता असे अनेक विकार जडतात.
 
काॅफीमध्ये असणाऱ्या कॅफिनमुळे मांसपेशींवर व मज्जातंतूंवर वाईट परिणाम हाेतात. कॅफिनमुळे आहार कमी प्रमाणात घेतला जाताे. कारण त्यामुळे भूक मंदावते. जास्त प्रमाणात, वारंवार काॅफी घेतल्यामुळे लाेह आणि कॅल्शिअमचे शरीरामध्ये शाेषण हाेत नाही किंवा ते मूत्रावाटे बाहेर टाकले जाते. त्यामुळे अ‍ॅनिमिया व हाडांचा ठिसूळपणा हे आजार वाढीस लागतात. क्वचित प्रसंगी थंडीपासून रक्षण करण्यासाठी एक बदल म्हणून अर्धा कप काॅफी प्यावी, त्यामुळे नक्कीच उत्साह वाढून ताजेपणा वाटेल; पण काॅफीचे राेजच वारंवार जास्त प्रमाणात सेवन केल्यास अस्वस्थपणा वाढून मानसिक ताण वाढताे. कारण कॅफिन हे एक प्रकारचे विषच आहे, त्यामुळे काॅफीचे दरराेज सेवन टाळावे.
 
Powered By Sangraha 9.0