पत्र एकविसावे
ईश्वर: सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति।। या हृदयातल्या देवाला तुम्ही काहीही नाव द्या. हरि म्हणा, हर म्हणा, विष्णु म्हणा, शंकर म्हणा.
तू असे लक्षात घे की- भावाला, भावनेला किंमत आहे. भाव नसेल तर देव नाही.
भाव नसेल तर भगवंत नाही
एकनाथ महाराज म्हणतात-
भाव ताेचि देव भाव ताेचि देव।
ये अर्थी संदेह धरू नका।।
एका जनार्दनी भावाच्या आवडी।
मनाेरथ काेडी पुरती तेणे।।
तुकाराम महाराज म्हणतात-
भाव देवाचे उचित। भाव ताेचि भगवंत।
तू आपल्या पत्रात लिहितेस-
‘‘आपल्या संस्कृतीमध्ये हरी व हर यांना फार किंमत आहे.
माझ्या मनात एक शंका आहे. काही लाेक म्हणतात - ‘‘हरीला किंमत द्या किंवा हराला किंमत द्या, पण हे लक्षांत असू द्या की पाश्चात्त्यांची संस्कृती आधिभाैतिक आहे व आपली संस्कृती आध्यात्मिक आहे. पाश्चात्य भाेगवादी आहेत तर आपण त्यागवादी आहाेत. भाेगापेक्षा त्याग श्रेष्ठ आहे.आधिभाैतिकतेपेक्षा आध्यात्मिकता श्रेष्ठ आहे. पाश्चात्यांचा जाेर कर्मावर आहे, पण शेवटी कर्मसंन्यास करणे हे आपले ध्येय आहे...’’ हे विचार मला पटत नाहीत. या बाबतीत तुमचा निकाल ऐकण्याची मला फार उत्सुकता लागून राहिली आहे...’’ तुझ्या शंकेबद्दल मी खूप विचार केला. माझा निकाल असा - हरी व हर हे समजून घेतले म्हणजे आपली खरी संस्कृती काय ते समजून येते. सतत कर्म करीत शंभर वर्षे जगण्याची इच्छा करावी. जे लाेक केवळ आधिभाैतिक जीवनाच्या मागे लागतात त्यांचा अध:पात हाेताे; जे लाेक केवळ आध्यात्मिक जीवनाच्या मागे लागतात त्यांचा फार माेठा अध:पात हाेताे.
आधिभाैतिक आणि आध्यात्मिक विद्यांच्या मिलाफातून आपण आपली जीवनयात्रा चालवावी. आधिभाैतिक विद्यांच्या मदतीने आपला भाैतिक जीवनक्रम यशस्वी हाेताे. आध्यात्मिक विद्यांच्या मदतीने आपणाला अक्षय्य सुखांची प्राप्ती हाेते. त्याग का भाेग असा वाद न करता त्यागयुक्त भाेग हे आपल्या जीवनाचे सूत्र असावे.आपल्या संस्कृतीचा आदर्श म्हणजे भगवान गाेपालकृष्ण.त्याच्या जीवनात आधिभाैतिक व आध्यात्मिकता यांचा सुंदर मिलाफ झाला हाेता. त्याग व भाेग यांचा सुरेख समन्वय म्हणजे गाेपालकृष्णाचे जीवन. गीतेमध्ये कृष्ण म्हणताे - नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि। एकादी अप्राप्त वस्तू मिळवणेची आहे हे माझ्या बाबतीत नसून देखील मी कर्मच करत आहे.तू विचारशील की मी जाे निकाल दिला त्याला आधार काय? तुझे विचारणे रास्त आहे. आधार असा - ईशावास्याेपनिषद फार महत्त्वाचे मानले जाते. त्यामध्ये असे म्हटले आह