अमेरिकी शास्त्रज्ञांना स्पेनच्या मालाेर्का बेटातील एका गुंफेत पाण्यात बुडालेला पूल सापडला आहे. हा पूल सुमारे 5,600 वर्षे जुना आहे. शाेधात समजले की, या गुंफेत त्या काळी मानवीवस्ती हाेती.तापमान वाढल्याने समुद्राचा जलस्तर वाढत गेला आणि हा परिसर पाण्यात बुडाला. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, भविष्यात अनेक शहरे अशाप्रकारे पाण्यात बुडतील. नेचर जर्नलच्या रिपाेर्टनुसार, भूमध्यसागराजवळ गुंफा सन 2000 मध्ये शाेधण्यात आली हाेती. तेव्हापासून इथे अनेक संशाेधन करण्यात आले. युनिव्हर्सिटी ऑफ साउथ फ्लाेरिडाच्या (यूएसएफ) शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली नवे संशाेधन करण्यात आले हाेते.स्कूबा डायव्हिंग करून त्यात शाेधण्यात आलेला पूल 25 फूट लांब आहे.हा पूल लाइमस्टाेनपासून (चुनखडी दगड) तयार करण्यात आलेला आहे. यूएसएफचभू-वैज्ञानिक बाेगडान ओनॅक यांनी सांगितले की, गुंफेत विशेष प्रजातीच्या बकरीची हाडेही आढळली आहेत. ती प्रजाती आता लुप्त झाली आहे.
पट्ट्यांचा अभ्यास: मालाेर्का खूप माेठे बेट असून, मानवांनी हजाराे वर्षांपूर्वी येथे राहण्यास सुरुवात केली. बकरीची हाडे आणि पुलावर असलेल्या अनेक रंगांच्या पट्ट्यांचा अभ्यास करण्यात आला. समुद्रात पडलेल्या वस्तूंवर वेगवेगळ्या रंगांचे थर जमा हाेतात.त्यांच्या अभ्यासातून या पुलाच्या वयाची माहिती मिळते.भूमध्य सागराच्या दाेन भागांच्या मध्ये संशाेधकांचे अनुमान आहे की, गुंफेच्या आत पूल पूर्व भूमध्यसागर आणि पश्चिम भूमध्यसागर यांच्यामधील अंतर कमी करण्यासाठी बांधण्यात आला हाेता. त्या काळातील लाेक या पुलाद्वारे समुद्राच्या एका भागातून दुसऱ्या भागात जात-येत असतील.