श्रद्धा, आस्था आणि भक्ती या तीन गाेष्टी 365 दिवस आणि 24 तास असतात हे आपण जाणताे आणि मानताे देखील; पण याला काही अपवादही आहेत. मात्र, इथे ज्या मंदिराची चर्चा आहे ते प्रचंड बर्फवृष्टी अथवा विरुद्ध-असह्य हवामानामुळे बंद झाल्याबाबतची नाही.एके काळी हसन शहराला सिहमानसपुरी म्हणून ओळखले जात असे, हसनम्बा मंदिराबाबत कितीतरी आख्यायिका आहेत; पण हे मंदिर केवळ दिवाळीच्या एका आठवड्यासाठीच का खुले असते, हे सर्वांत आश्चर्यकारक आहे.या मंदिराशी संबंधित पाैराणिक कथा मनाेरंजक आहे. अंधकासुर नावाच्या राक्षसाने अत्यंत कठाेर तपश्चर्या केली आणि त्याला ब्रह्माजीकडून अंतर्धानाचे वरदान मिळाले.अंधकासुर राक्षस हाेता आणि त्याला देवाकडून असे अद्भुत वरदान मिळाले, यामुळे ताे उन्मत्त झाला, याच्या अत्याचारामुळे त्याने लाेकांना रडायला लावले.
भाेळ्याभाबड्या भगवान शंकरांना भक्तांचे दुःख दिसले. त्यांनी अंधकासुराला मारण्याचा निर्णय घेतला; परंतु त्याच्याकडे आणखीही काही आश्चर्यकारक शक्ती हाेत्या, हे लक्षात आले.त्याला मारण्याचा जेव्हा प्रयत्न केला गेला तेव्हा त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाने भुते उत्पन्न झाली.शेवटी भाेलानाथने आपल्या अफाट सामर्थ्याने याेगेश्वरी देवी निर्माण केली, जिने अंधकासुराचा नाश केला.दिवाळीच्या सात दिवसांत हे मंदिर भाविकांसाठी खुले केले जाते. या काळात भाविक येथे समुद्र दर्शनासाठी येतात. स्थानिक प्रांतात बलिपद्यामी किंवा बलिप्रतिपदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवशी मंदिर पुन्हा बंद हाेते. हा सण दिवाळीच्या चाैथ्या दिवशी साजरा केला जाताे. हा सण दैत्यराजा बळीच्या पृथ्वीवर काल्पनिक पुनरागमन म्हणून साजरा केला जाताे.
हा सण कार्तिक महिन्याच्या पहिल्या किंवा साेळाव्या दिवशी येताे, जाे ऑक्टाेबर किंवा कधी कधी नाेव्हेंबरमध्ये येताे.हसनाम्बे मंदिर बंद झाल्यानंतर बाहेर दिवा लावला जाताे आणि प्रसादासह ताजी फुले अर्पण केली जातात. आश्चर्याची बाब म्हणजे वर्षभरानंतर मंदिर उघडल्यावर येथील दिवा प्रज्वलित असताे आणि येथे वाहिलेली फुलेदेखील टवटवीत असतात. विशेष म्हणजे नैवेद्यही खराब हाेत नाही. हा चमत्कार स्वतःच्या डाेळ्यांनी पाहण्यासाठी हजाराे भाविक येथे गर्दी करतात.हे मंदिर पाहुण्यांसाठी खुले झाल्यावर हसनचे प्रशासन, पाेलीस यंत्रणा आणि स्वतः जिल्हाधिकारी तैनात असतात. यावेळी शेजारील जिल्ह्यातूनही पाेलीस अधिकारी बाेलावले जातात.महिलांना येथे येण्यासाठी राज्य सरकार माेफत बस चालवते.
महिलांच्या उल्लेखासह मंदिराशी संबंधित आणखी एक मिथक आहे. एकदा ब्राह्मी, माहेश्वरी, कुमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी आणि चामुंडी अशा सात माता दक्षिण भारतात आल्या हाेत्या. हसनचे साैंदर्य पाहून त्यांनी येथेच स्थायिक हाेण्याचा निर्णय घेतला. माहेश्वरी, कुमारी आणि वैष्णवी माता मंदिरात वास्तव्यास हाेत्या. त्यामुळे ब्राह्मी माता हसकाेटेच्या भिंतीत स्थिरावल्या आणि इंद्राणी, वाराही आणि चामुंडी मातेने देवघरी हाेंडाच्या तीन भिंती निवडल्या.मंदिरात असणारी हसनम्बे अतिशय दयाळू आहे, परंतु जे भक्तांना त्रास देतात त्यांच्याबद्दल ती अत्यंत कठाेर आहे. याबाबतही एक आख्यायिका आहे. इथे सासूने सुनेशी गैरवर्तन केले. ही सून हसनम्बे आईची पूजा करायची.एकदा सासू कर्णकर्कश्शपणे ओरडत तिच्या मागे धावत आली आणि कामापेक्षा पूजा महत्त्वाची आहे का, असे म्हणत तिने सुनेच्या डाे्नयात भांडे फेकून मारले.
यावेळी सून हसनम्बे आईकडे रक्षणासाठी याचना करू लागली.देवीने तिला दगड बनवले आणि आपल्या संरक्षणाखाली मंदिरात ठेवले. आजही ‘साेस कल्लू’ (वधूचा दगड) मंदिरात आहे. हा दगड आईच्या प्रतिमेकडे एका तांदळाच्या दाण्याइतका पुढे सरकत आहे. ताे दगड देवीच्या मूर्तीपर्यंत पाेहाेचला की कलियुग संपेल, अशी भाविकांची श्रद्धा आहे.वर्षभर तांदूळ, फुले, तुपाच्या दिव्यांच्या नैवेद्यात आई जागी असते आणि म्हणून मंदिर वर्षभर बंद असते, अशी आख्यायिका आहे.पुढच्या वर्षी मंदिर उघडल्यावर दिव्याची अखंड ज्याेत, ताजी फुले आणि खराब न झालेला तांदूळ ही देवीची दैवीशक्ती आहे, असे मानले जाते.या मंदिराच्या आत किडियारा राफडा, वीणा वाजवणारा नऊ डाेक्यांचा रावण आणि भगवान शिव म्हणून दिसणारे सिद्धेश्वर स्वामी आणि हसनाम्बे देवी ही मंदिराची अत्यंत दुर्मिळ वैशिष्ट्ये आहेत.