जपानमध्ये कंपन्या कर्मचाऱ्यांना 12 तास काम करायला लावतात

17 Dec 2024 19:12:07
 
 


Japan
 
 
 
जपानमध्ये काम करणाऱ्या कुशल लाेकांची इतकी कमतरता आहे की, कंपन्यांमध्ये 12-12 तास काम करायला लागते. काही कंपन्यांमध्ये ओव्हरटाइमसुद्धा करून घेतला जाताे. सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंतच्या कामाला सामान्य मानले जाते.
स्थिती अशी आहे की, कामाच्या ओझ्याने थकून नाेकरी साेडण्यासाठी इच्छुक कर्मचाऱ्यांचा राजीनामासुद्धा मंजूर केला जात नाही. या कारणाने अनेक लाेक राजीनामा लिहिण्यासाठी नाइलाजाने कंसल्टन्सी कंपन्या, तज्ज्ञ किंवा वकिलांची मदत घेत आहेत.कर्मचारी यूकी वतनबे सांगतात की, दरराेज 12 तास ऑफिसमध्ये घालवावे लागतात. राजीनामा दिला तर ताे मंजूरच केला गेला नाही. त्यांनी राजीनामा देण्यासाठी मग एका ए्नस्पर्टची मदत घेतली. माेठ्या दूरसंचार आणि ई-पेमेंट कंपन्यांमध्ये ही समस्या जास्त आहे. काही प्रकरणांमध्ये बाॅस राजीनामा पत्रच फाडून टाकतात.
 
24 वर्षीय एका कर्मचाऱ्याने म्हटले, सकाळी यायचे आणि रात्री 11 वाजल्यानंतरच कार्यालयातून बाहेर पडायचे.असे राेज हाेत आहे. यूकी वतनबे आपल्या मागच्या नाेकरीचा अनुभव सांगतात. त्याकामाच्या जास्त तासांमुळे नाराज हाेत्या.पण, राजीनामा देण्याची हिंमत करू शकत नव्हत्या. वतनबे यांनी सांगितले की, ‘माझी इच्छा नव्हती की, माझा राजीनामा नाकारला जावा.म्हणून राजीनामा लिहिण्यासाठी कंसल्टन्सी कंपनी माेमुराची मदत घेतली.’ काेराेना महामारीनंतर जपानमध्ये कर्मचाऱ्यांना राजीनामा लिहिण्याबराेबरच इतर मुद्द्यांवर मदतीसाठी कंसल्टन्सी एजन्सींची मागणी वाढली आहे. माेमुरीचे ऑपरेशन्स व्यवस्थापक शिओरी कावामाता यांनी म्हटले की, मागील वर्षी एकट्या त्यांच्याकडे 11,000 पेक्षा जास्त लाेकांनी राजीनाम्याविषयी चाैकशी केली. माेमुरीची सुरुवात टाे्नयाेच्या मिनाटाेमध्ये सन 2022 मध्ये करण्यात आली हाेती.
 
जपानीमध्ये ‘माेमुरी’चा अर्थ आहे ‘मी आता असे करू शकत नाही.’ राजीनामा देण्याकरिता सल्ला देण्यासाठी सल्लागार कंपनी 20 हजार रुपये फी घेते. पण पार्टटाइम काम करणाऱ्यांसाठी ही फी अर्धी आहे. ही सल्लागार कंपनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीशी काही विवाद झाल्यास कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांची सेवा देण्याचे आश्वासनही देते. कावामाता म्हणाले, ‘कर्मचाऱ्यांनी गुडघ्यावर बसून विनंती केली तरीही कंपन्या त्यांना नाेकरी साेडू देत नाहीत.’ जास्त काम करायला लावणाऱ्या 370 कंपन्या ब्लॅक लिस्ट झाल्या. जपानमध्ये दीर्घकाळ जास्त काम करण्याची संस्कृती आहे. कर्मचारी तासन्तास जास्त काम करतात आणि कंपनीविषयी सन्मानजनक बाेलतात.अशा कंपन्यांना ‘ब्लॅक फर्म’च्या रूपान ओळखले जाते. सरकार सन 2017 पासून दर वर्षी अशा कंपन्यांची यादी जाहीर करते, जिथे कामाचे तास निश्चित नाहीत.
Powered By Sangraha 9.0