पुणे जिल्ह्यातील विकासाच्या राेडमॅपला गती देणार

17 Dec 2024 19:22:41
 
 
 

CM 
पुणे जिल्ह्याच्या विकासाचा राेडमॅप मागील अडीच वर्षांत सेट केला आहे. त्याला गती देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच पुणे दाैऱ्यावर आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बाेलताना दिले.पुणे पुस्तक महाेत्सवाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आज पुण्यात आले हाेते. विमानतळावर आल्यानंतर शहर भाजपच्या वतीने त्यांचे जाेरदार स्वागत करण्यात आले. या प्रसंगी माजी मंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार हेमंत रासने यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. यावेळी फडणवीस माध्यमांशी बाेलत हाेतेवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. वाचनसंस्कृती वाढावी यासाठी मागील वर्षी आयाेजित केलेल्या पुस्तक महाेत्सवाला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला हाेता.
 
त्यावेळी देखील मी या महाेत्सवाला भेट दिली हाेती. त्यामुळे यंदा निमंत्रण मिळाल्यानंतर मी येथे आवर्जून आलाे आहे.मुंबईतील दादर येथील रेल्वेच्या जागेतील 80 वर्षे जुने हनुमान मंदिर हटवण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने नाेटीस दिली हाेती. यावरून गदाराेळ झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने आज ही नाेटीस मागे घेतली आहे.मंदिरांसंदर्भात यापूर्वी न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यामध्ये मंदिर आणि प्रार्थनास्थळांची वर्गवारी करण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानुसार जुनी मंदिरे नियमित करण्याची तरतूद आहे. रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून त्यातून निश्चित मार्ग काढण्यात येईल.याप्रसंगी मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया देणे फडणवीस यांनी टाळले.
Powered By Sangraha 9.0