जगातील सर्वांत उंच माणूस, 8 फूट 11 इंच

    11-Dec-2024
Total Views |
 
 
height
आमचा एक खास मित्र गमतीने सांगताे, की शारीरिक उंची कधीच माेजली जात नाही. ते खरे आहे.पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे फक्त पाच फूट दाेन इंच उंच हाेते; पण त्यांचे व्यक्तिमत्त्व आकाशाला भिडणारे हाेते.क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची उंचीही शास्त्रीजींइतकीच आहे. आमिर खान (5.8 फूट), शाहरुख खान (5.7 फूट), आणि अमिताभ बच्चन (6.17); पण त्यांच्या यशाकडे पाहिले पाहिजे.आता इथे जगातील सर्वांत उंच माणसाबद्दल बाेलणार आहे. त्याचे नाव आहे राॅबर्ट वॅडलाे. त्यांची उंची 8 फूट 11 इंच म्हणजे 2.72 मीटर! हाेय. इतिहासात राॅबर्ट वॅडलाे यांचा सर्वांत उंच व्यक्ती म्हणून विक्रम आहे.याचा कागदाेपत्रीही पुरावा आहे. या कारणास्तव त्यांना अनेक उपाधी आणि टाेपणनावे मिळाली. जसे की- ‘द जेंटल जायंट’, ‘द टाॅलेस्ट मॅन हू एव्हर लिव्ह्ड’. ‘द जेंटलमन जायंट’, ‘द बाॅय जायंट’, ‘द ऑल्टन’ आणि ‘द जायंट ऑफ इलिनाॅइस.’ या त्यांच्या उंचीच्या छायेत, विक्रम आणि प्रसिद्धी ही मार्मिकता आहे.
त्यांच्या वडिलांचीही उंची 5 फूट आणि 11.5 हाेती. राॅबर्ट यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1918 राेजी अल्टाेन, इलिनाॅय, यूएसए येथे झाला हाेता. त्यांचे मूळ नाव राॅबर्ट पर्शिंग वॅडलाे. त्यांच्या पिट्यूटरी ग्रंथी किंवा हायपाेथायराॅईडीझममुळे त्यांची (ह्युमन ग्राेथ हार्माेन) उंची, आकार आणि वजन वाढले आणि वयाच्या 22व्या वर्षी मृत्यू झाला, त्या वेळी राॅबर्ट यांची उंची 8 फूट 11.2 हाेती आणि वजन 199 किलाे हाेते.वॅडलाे दम्पती हॅराेल्ड फ्रँकलिन आणि डी मे यांच्या पाच मुलांपैकराॅबर्ट सर्वांत माेठा हाेता. प्राथमिक शाळेत त्यासाठी विशेष बेंच तयार करावे लागले हाेते. शाळा संपेपर्यंत त्यांची उंची 8 फूट 4 इंच झाली हाेती. त्यानंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला. चालताना त्यांना लेग ब्रेसेस घालावे लागत.किंबहुना त्यांच्या पायात किंचित संवेदना जाणवत हाेत्या. मात्र, त्यांनी कधीही व्हीलचेअरचा सहारा घेतला नाही.
1938मध्ये, राॅबर्टने आंतरराष्ट्रीय शू कंपनीसाठी प्रमाेशनल टूर सुरू केला, त्या बदल्यात कंपनी त्यांना माेफत बूट देत असे. त्यांच्या मृत्यूच्या एक वर्ष आधी त्यांनी जगातील सर्वांत उंच माणसाच्या बिरुदावर दावा केला हाेता, जाे पूर्वी जाॅन राेगन (8 फूट, 9 इंच)यांच्याकडे हाेता. ताे निग्राे हाेता आणि अमेरिकेतील टेनेसीचा रहिवासी हाेता.त्यांचेही लहान वयात म्हणजे वयाच्या 38व्या वर्षी निधन झाले. एक गुलामाचा मुलगा, कृष्णवर्णीय आणि शारीरिकदृष्ट्या अपंग.रेल्वे स्टेशनवर पाेस्टकार्ड आणि पाेट्रेट विकून उदरनिर्वाह करत असे. राॅबर्ट वॅडलाेच्या आयुष्यातील सर्वांत दुःखदायक दिवस म्हणजे 4 जुलै 1940.ताे एका फेस्टिव्हलमध्ये प्राेफेशनली दिसणार हाेता.
चुकीच्या ब्रेसेसमुळे त्यांच्या गुडघ्यावर रॅश आली आणि त्यांना संसर्ग झाला. रक्तस्राव झाला आणि नंतर त्याला शस्त्रक्रिया आवश्यक हाेती; परंतु त्यांची प्रकृती खालावली आणि 15 जुलै राेजी त्यांनी झाेपेतच डाेळे मिटले.त्यांच्यासाठी 10 फूट 9 इंची शवपेटी तयार करण्यात आली हाेती, ज्याचे वजन एक हजार किलाेपेक्षा जास्त हाेते. त्यांना इलिनाॅयमधील एक्लेटन येथील ओकवूड स्मशानभूमीत पुरण्यात आले, ज्यामध्ये बारा पालवाहक आणि आठ सेवक शवपेटी घेऊन गेले. 1986मध्ये ऑस्टेन म्युझियम ऑफ हिस्ट्री अँड आर्टच्या बाहेर राॅबर्ट वॅडलाेचा पूर्ण आकाराचा पुतळा त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आला.
आजारपणामुळे राॅबर्ट वॅडलाेने जी उंची मिळवली ताे इतिहासच आहे, पण बाल, किशाेर आणि तरुण म्हणून त्यांनी काय गमावले हाही खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्या जिवंत असलेला सर्वांत उंच माणूस तुर्कीचा सुलतान काेसेन आहे. त्याची उंची 8 फूट आणि 2.8 इंच आहे. पिट्यूटरी ग्रंथीच्या अचानक वाढलेल्या गाठीमुळे वयाच्या दहाव्या वर्षी असामान्यपणे त्याची उंची वाढू लागली; परंतु ताे राॅबर्ट वॅडलाेच्या उंचीपर्यंत पाेहाेचेल का, याबद्दल शंका आहे. सध्या उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधा आणि औषधांमुळे राॅबर्टसारख्या शारीरिक समस्यांचा काेणालाही अनुभव येणे दुर्मीळ आहे.