वस्त्र आणि निवाऱ्याबाबत तडजाेड करता येत असली, तरी अन्नाबाबत नाही. दैनंदिन धावपळीसाठी आवश्यक असलेल्या ऊर्जेसाठी अन्नच हवे. स्थानिक भूगाेल आणि हवामानानुसार आहार ठरताे. अन्न ही प्रत्येकाची गरज असली, तरी एकीकडे त्याची उधळपट्टी आणि दुसरीकडे कमतरता असे विदारक चित्र भारतासह जगात दिसते. अन्न वाया घालविण्याचे प्रमाणही माेठे आहे. उधळपट्टी आणि करुणा हे दाेन्ही विराेधाभासी शब्द आहेत. मात्र, देशातील काही बिगर सरकारी संस्थांनी (एनजीओ) हे वाया जाणारे अन्न गरजूंना देणे सुरू केले आहे.दाेन वर्षांची रिया ही चिमुकली अशीच एक गरजू आहे. ती राहत असलेल्या वसाहतीत लवकरच अन्न वाटणारे लाेक येणार असल्याने तीसुद्धा छाेट्याशा हातांत ताटली धरून रांगेत उभी असलेली रिया अन्नाची वाट पाहते. रांगेत उभे असलेल्यांकडे ताटल्या, मग, पातेली आणि बाउल्स आहेत.
घरी जे भांडे असेल, ते घेऊन हे गरजू आले आहेत. रियाची शेजारीण असलेल्या सहा वर्षांच्या साईमा या मुलीला आज काय मिळेल याची उत्सुकता आहे. दिल्ली-मेरठ ए्नसप्रेस-वेवरील नाेएडातील एका झाेपडपट्टीतील हे चित्र आहे. राेजंदारी करून उदरनिर्वाह करणारे येथे जास्त राहतात आणि त्यातील अनेक जण अशा वाटल्या जाणाऱ्या अन्नावर अवलंबून असतात.‘आज खायला काय मिळेल?’ याचे साईमाला कुतूहल आहे.एकदा तिला राेटी आणि मटर पनीर मिळाले हाेते. एकदा सगळ्या भाज्यांचे मिश्रण असलेली म्निस व्हेज ही डिश आणि एकदा तर गाेड केकसुद्धा. आज या सगळ्यांना भात आणि काळी डाळ असे पदार्थ मिळाले. जवळच असलेल्या एका मंगल कार्यालयात झालेल्या विवाह समारंभातील भाेजनानंतर उरलेले हे पदार्थ साईमा आणि इतरांच्या वाट्याला आले हाेते. या रांगेत प्रथम क्रमांकावर असलेल्या शंभू याच्या ताटलीत दाेन डाव भात आणि तेवढीच डाळ हाेती. ‘हे जेवण मी रात्री घेईन.
रात्री उपाशी झाेपण्यापेक्षा मी दुपारचे जेवण टाळेन,’ असे सात वर्षाचा हा मुलगा सांगताे. अन्न वाया जाण्याचे प्रमाण भारतात फार माेठे असून, दरराेज लाखाे टन असे त्याचे प्रमाण दिसतेहाॅटेल, रेस्टाॅरंट्स आणि घरांमधील हे प्रमाण आहे.मात्र, स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांमुळे हे सगळे अन्न वाया जात नाही. या संस्था हे अन्न गाेळा करून गरजू आणि भुकेलेल्यांपर्यंत पाेहचवितात.भारतातील अनेक शहरे-गावांत असे अन्न गाेळा केलेली वाहने झाेपडपट्ट्या, पदपथ, गरीब लाेकांच्या वसाहती आणि अनाथालयांपुढे दरराेज उभी राहतात. संस्थांचे स्वयंसेवक अशा गरजू आणि बेघरांना या अन्नाचे वाटप करतात. वाया जाणारे अन्न काेणाची तरी भूक भागविते हे महत्त्वाचे. भारतातच नव्हे, तर जगभरात अन्नाच्या नासाडीचे प्रमाण जास्त असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या या वर्षीच्या अन्न विनाश निर्देशांकावरून (फूड वेस्ट इंडे्नस) दिसते.
संघटनेच्या माहितीनुसार, 2022मध्ये जगभरात 1.05 अब्ज टन अन्न वाया गेले. घरे, रिटेल आणि सेवा क्षेत्रांचा त्यात समावेश हाेता. 2023च्या जागतिक भूक निर्देशांकानुसार, भारतात 233 दशलक्ष लाेक उपासमारीबराेबर सामना करत असताना अन्न वाया घालविण्याचे प्रमाण जास्त हाेते. व्यावसायिक संस्थांकडील उरलेले अन्न गाेळा करणे साेपे असले, तरी प्रत्येक घरात जाऊन तसे करणे श्नय नसल्याने तेथे दरराेज किती अन्न वाया जाते याचा हिशेब मिळत नाही. ‘मंगल कार्यालये, रेस्टाॅरंट्स, कम्युनिटी सेंटर्स, बेकऱ्या आणि ्नलाउड किचन्समार्फत आम्हाला शिल्लक अन्नपदार्थ मिळतात. जवळ असलेल्या गरजू वसाहतींमध्ये नेऊन आम्ही ते वाटताे,’ असे दिल्लीतील ‘राॅबिन हूड आर्मी’ या एनजीओचे एक स्वयंसेवक मनीष यांनी दिली.
दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात या संघटनेचे 500 स्वयंसेवक आहेत. ‘अन्न वाटण्याचे काम चांगले असले, तरी ते साेपे नाही. अन्नाचे वाटप करण्यापूर्वी ते खराब झालेले नसल्याची खात्री करून घ्यावी लागते. उदा. खूप दिवसांपूर्वीच्या आणि करपलेल्या चपात्या आम्ही स्वीकारत नाही. हाच निकष सर्व पदार्थांबाबत पाळला जाताे आणि गाेळा केलेले अन्न लवकरात लवकर गरजूंना दिले जाते,’ असे अक्षय या अन्य एका स्वयंसेवकाने सांगितले.एका फेरीत साधारणपणे 80-100 लाेकांना अन्न दिले जाते. अन्न जास्त असेल, तर काही वेळा 500 लाेकांनाही जेवण देता येऊ शकते. पाय आणि ब्रेड या दाेन बेकरीजन्य उत्पादनांचा टिकण्याचा कालावधी कमी असल्याने न विकले गेलेले पाय आणि ब्रेड हे पदार्थ बेकरीचालक अशा संस्थांना देतात. ‘अन्न सुरक्षेच्या नियमांनुसार आम्ही उत्पादन झाल्यानंतर एक दिवस उलटला असेल, तर ते पदार्थ आम्ही देत नाही.
दिवसभरात विक्री न झालेले ब्रेड आणि पाय आम्ही देताे,’ अशी माहिती नाेएडातील डिफेन्स बेकरीचे चालत प्रफुल्ल धिंग्रा यांनी दिली. गाेळा केलेल्या अन्नाचा दर्जा कायम ठेवण्यासाठी एनजीओसुद्धा जागरूक असतात. उन्हाळ्याच्या दिवसांत अन्न लवकर खराब हाेत असल्याने त्याचे वाटप लवकरात लवकर केले जाते. अन्न खराब हाेऊ नये म्हणून ते वातानूकुलित वातावरणात ठेवले जाते. गुरुग्राममधील ‘मेरा परिवार’ या एनजीओमार्फत स्वत: तयार केलेल्या अन्नाचे वाटप केले जाते. ‘काही वितरक आम्हाला सहकार्य करतात. ते आम्हाला गहू, तांदूळ, पिठे आणि मसाले पुरवितात.