वारंवार भूक लागणेही आजार आहे

    11-Dec-2024
Total Views |
 
 

Health 
काय असू शकते कारण : हा आजार वेगवेगळ्या हार्माेनल बदलामुळेही हाेताे. काही जेनेटिक म्यूटेशनच्या रुपात असतात जे माणसाच्या जन्मापासूनच उत्पन्न हाेतात. भूक नियंत्रित करणारे लेप्टिन हार्माेनचे शरीरात असंतुलन झाल्यामुळेही हा आजार हाेऊ शकताे. यासाेबतच शुगर थायराॅइड अशा आजारांमुळेही जास्त भूक लागण्याची लक्षणे निर्माण हाेतात ज्यामुळे हायपरफेजिया हाेण्याची श्नयता वाढते.
 
या समस्या उभारतात : जास्त वजन वाढल्यास काेणत्याही प्रकारची हालचाल करण्यात समस्या येते. याशिवाय मधुमेह अनियंत्रित हाेणे, रक्तदाब अत्याधिक वाढणे, काेलेस्ट्राॅल वाढणे अशा समस्या हाेऊ लागतात. मानसिक स्थितीही अशी हाेते की, रुग्ण वारंवार उलटी करताे, जास्त खाताे, ज्यामुळे पाेटात व्रणाची लक्षणे निर्माण हाेण्याची श्नयता वाढते. अवाजवी वजनामुळे जर व्यक्तीच्या दिनचर्ये वर परिणाम हाेऊ लागला तर त्यावर त्वरित उपचार करायला हवेत.
 
लक्षात ठेवण्याजाेग्या गाेष्टी : जेव्हा झाेप पूर्ण हाेत नसते तेव्हा शरीरात ग्रेलिन हार्माेनचे प्रमाण वाढत जाते ज्यामुळे वारंवार भूक लागते. यामध्ये सायकाेलाॅजिकल काउन्सलिंग आणि आहार विशेषज्ञाची भूमिका महत्त्वाची असते. आहारविशेषज्ञ रुग्णाला अवाजवी खाण्यापासून तर राेखू शकताे पण त्याच्या खाण्यात आवश्यक पाेषक घटक म्हणजेच मिनरल व व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात आहेत हे सुनिश्चित करताे. तसेच सायकाेलाॅजिकल काउन्सलिंग आणि डाएटशी संबंधित बदल टिकवावे लागतील कारण असा रुग्ण पुन्हा वारंवार खाणे सुरू करताे ज्यामुळे पुन्हा त्याचे वजन वाढू शकते.
 
या सवयी लावून घ्या
 नियमितपणे डाॅ्नटरांशी काउंसलिंग करणे आवश्यक असते.यात कुचराई करू नये.
 खाण्याची इच्छा झाल्यानंतर कमी कॅलरीचे खाद्य म्हणजेच भाज्या, संत्री, बीट इ. घ्यावे.
 जस्त वजन वाढवणारे खाद्यपदार्थ म्हणजेच चीज, मेयाेनीज, फास्टफूड, काेल्ड ड्र्निंस वा गाेड पदार्थ टाळावेत.
 नियमित व्यायाम करून जादा कॅलरी खर्च करून वजन आटाेपशीर ठेवावे.
 पुरेशा प्रमाणात पाणी पित राहावे. जेवणापूर्वी पाणी प्याल्यास उशीरपर्यंत भूक लागत नाही. यासाठी शरीरात पाणी कमी पडू देऊ नये.
 
जाणून घ्या काही घरगुती उपाय
 
हिरव्या मिरचीतील कॅप्सेइसिन मेटाबाॅलिज्म वाढते आणि खाण्यात याचा वापर करणे हायपरफेजियात लाभदायक असते.सॅलडमध्ये काळी मिरी नियमित सेवन केल्यास जादा चरबी बाहेर पडते व काेलेस्ट्राॅल कमी हाेताे.