थंडीतील उत्तम आराेग्याचे रहस्य...

    07-Nov-2024
Total Views |
 
 

winter 
 
हिवाळ्याच्या याेग्य आहाराचा अर्थ हिवाळ्यात सूर्यप्रकाश व उबदारपणा कमी हाेताे. यामुळे आपल्या शरीरात असे काही बदल हाेतात ज्यामुळे आपला तणाव वाढून आपल्याला उदास वाटू लागते. यामुळे बऱ्याचदा आपण स्ट्रेस इटिंग करताे. याशिवाय स्वत:ला गरम राखण्यासाठी वारंवार खाणे पसंत करताे. या सर्व कारणांमुळे आपण थंडीत नेहमी जास्त कार्बाेहायड्रेट आणि स्निग्ध पदार्थ खाऊ लागताे. अशावेळी सुदृढ राहण्यासाठी पाैष्टिक घटकांनी भरपूर समताेल आहाराची निवड करणे अत्यावश्यक असते.
 
न्यूट्रीशनिस्ट सांगतात की, आहाराच्या याेग्य निवडीसाेबतच आपल्याला जेवणाच्या याेग्य पद्धतींची माहिती असायला हवी.आहार भलेही कितीही आराेग्यदायी असला तरीताे व्यवस्थित पचवू शकलाे नाही तर ताे आहारही आपल्याला आतून आजारी बनवू शकताे.चला मूळ गाेष्टींकडे आपल्या आहारात पाेषणयुक्त खाद्यपदार्थ सामील केल्यामुळे फक्त आराेग्याशी संबंधित त्रासांचा सामना करण्याची ताकदच आपल्याला आतून मिळत नाही तर गुलाबी थंडीच्या या माेसमाची सारी मजाही लुटता येते.खालील सुपरफूड या कामात आपली मदत करू शकतात.
 
डिंक : हा उष्ण असून सांध्यांना बळकटी देण्याचे, पचनप्रणाली मजबूत करण्याचे, गॅस व पीरियडसंबंधित त्रासांना लगाम घालण्याचे काम करताे. डिंक तूपात व्यवस्थित भाजून त्याच चवीनुसार सखर मिसळून त्यांचे लाडू बनवा. या लाडूत मनपसंत सुकामेवाही घालू शकता.
 
कुळीथ : फाॅस्फाेरस, कॅल्शियम, प्राेटीन आणि आयर्नने भरपूर या डाळीला हिवाळ्यात आपल्या आहाराचा भाग बनवा.
जुन्या काळी सर्दी, पडसे, ताप, खाेकला, ब्राँकायटिस अशा समस्या झाल्यास कुळीथ खाण्याचा सल्ला दिला जात असे. हे आपण पराठा, सूप व वरणआमटीच्या रुपात आहारात सामील करू शकता.
 
तीळ : थंडी सुरू हाेताच तीळाला आहाराचा भाग बनवा.तीळ आपण लाडू, गजक, चटणी व गार्निशिंगच्या रुपात आहारात घेऊ शकताे. तीळात फॅटी अ‍ॅसिड्स आणि व्हिटॅमिन-ई भरपूर प्रमाणात असते. याच्या नियमित सेवनाने हाडे, केस व त्वचेचे आराेग्य उत्तम राहते.
 
तूप : वरण, भात, चपाती प्रत्येक पदार्थावर तूप टाका आणि त्याचा आस्वाद घ्या. शरीराला उबदारपणा देण्याव्यतिरिक्त तूप व्हिटॅमिन्स, मिनरल्सआणि आराेग्यदायी स्निग्धतेचा अत्यंत चांगला स्राेत आहे.
 
आहारात हवीत ही फळे : हिवाळ्यात काही फळे आपल्या आहारात सामील करून आपण उत्तम आराेग्य मिळवू शकता. फळे याेग्यप्रकारे खाण्याविषयी न्यूट्रीशियन सांगतात की, फळे कधीही रिकाम्या पाेटी खाऊ नयेत. तसेच ती जेवणानंतर दाेन तासांनी खावीत. असे न केल्यास गॅस व ब्लाेटिंगची समस्या हाेऊ लागते.
 
सफरचंद : हिवाळ्यात हे खाल्ल्यास आपले न्यूराेलाॅजिकल समस्यांपासून रक्षण हाेऊ शकते. सफरचंद आपण तसेही खाऊ शकता आणि स्मूदी व रायत्यात टाकूनही खाऊ शकता.