कुठलाही साखर कारखाना अडचणीत आल्यावर, माझ्या हातात सत्ता हाेती ताेपर्यंत मी पक्ष बघितला नाही, जात बघितली नाही. सरसकट मदत केली. असे असताना तुमच्या सभासदांना, तुमच्या कामगारांना तुम्ही दम देता? आता काेणी दम दिला, तर मला सांगा, तुमच्याबराेबर त्याच्या घरीच येताे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार गटाला निर्वाणीचा इशारा दिला; तसेच गेली तीस वर्षे अजित पवारांनी इथला कारभार सांभाळला. जे काही लाेकांसाठी करता येईल ते त्यांनी केले. माझी 30 वर्षे झाले. अजित पवारांची 30 वर्षे झाली.आता पुढची 30 वर्षे काय करायचं सांगा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आयाेजित प्रचारसभेमध्ये ते बाेलत हाेते.
आजचे राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करत नाहीत. जाे शेतकऱ्यांचे हित बघत नाही त्यांचं माझं जमत नाही. म्हणून आज समाजकारण बदलायचंअसेल, तर अर्थकारण बदललं पाहिजे. अर्थकारण बदलायचे असेल, तर शेती सुधारली पाहिजे. शेतमालाच्या किमती वाढल्या पाहिजेत. खते-औषधाच्या किमती कमी झाल्या पाहिजेत; तरच खऱ्या अर्थाने परिवर्तन येईल. ते परिवर्तन आणायचे आहे.त्यासाठी सत्तापरिवर्तन झाले पाहिजे. मी महाराष्ट्रात फिरताेय, लाेकांची मनस्थिती सत्तापरिवर्तनाला अनुकूल आहे, असे शरद पवार म्हणाले.पतसंस्था चालक, कारखान्याचे चेअरमन मतदारांना धमकावत आहेत, अशा चिठ्ठ्या मला आल्या आहेत. कामगारांना नाेकरीवरून काढू, असं सांगत आहेत.
माझी विनंती आहे, जे काेण चेअरमन असतील या कारखान्याच्या हितासाठी माझ्याकडे 50 वेळा आले. मी पक्ष बघत नाही, त्यांची जात माझ्या दृष्टीने एकच ती म्हणजे शेतकरी.कुठलाही साखर कारखाना अडचणीतआल्यावर माझ्या हातात सत्ता हाेती ताेपर्यंत मी पक्ष बघितला नाही, जात बघितली नाही. सरसकट मदत केली. त्याला साेमेश्वर साखर कारखानासुद्धा अपवाद नाही. असं असताना तुमच्या सभासदांना, कामगारांना तुम्ही दम देता? आता काेणी दम दिला, तर मला सांगा. मी येताे तुमच्याबराेबर त्याच्या घरी, असा थेट इशाराही शरद पवार यांनी दिला. आम्ही कधी चुकीच्या रस्त्याने जात नाही; पण लाेकशाहीमध्ये मत द्यायचा हा तुमचा अधिकार आहे. ज्या गावच्या बाेरी त्याच गावच्या बाभळी. त्यामुळे तुम्ही त्या भानगडीत पडू नका. पुन्हा माझ्या कानावर जर बाब आली, तर मी आहे. तुम्ही काळजी करू नका. लाेकशाहीच्या विराेधात काेणी जाऊ नये, एवढेच माझं सांगणं आहे, असंही शरद पवार म्हणाले.