काट्याचमच्यांचं शास्त्र

    05-Nov-2024
Total Views |
 
 
 

thoughts 
काटेचमचे साेडा, अलीकडची पिढी तर चायनीज, जॅपनीज, काेरियन पदार्थ खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चाॅपस्टिक्स नामक दाेन पातळ काटक्याही फार सराईतपणे वापरताना दिसते.काट्याचमच्याने खावं लागेल, या कल्पनेने ऐपत असूनही पंचतारांकित रेस्टाॅरंटमध्ये न गेलेले कितीतरी लाेक असतील आदल्या पिढीत. जे धारिष्ट्य करून जायचे, त्यातले बहुतेक तिकडची शास्त्रं न पाळता सरळ हाताने खायचे समाेरचे पदार्थ. आताही सराईतपणा आला आहे ताे काट्याचमच्याने आणि सुरीने पदार्थ कापून, याेग्य आकाराचे तुकडे करून, नकाेसे भाग वेगळे करून ते ताेंडात टाकण्याच्या तांत्रिक काैशल्यात.
 
काट्याचमच्यांचं काही शास्त्र असतं, हेही अनेकांना माहिती नसेल. ते फक्त सनदी अधिकारी बनायला निघालेल्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनाच माहिती असेल. इथे हे शास्त्र उलगडून सांगितलेलं आहे.जिथे थ्री काेर्स, फाेर काेर्स जेवण असतं तिथे भारतीय पद्धतीप्रमाणे एकत्रित सगळे पदार्थ वाढले जात नाहीत.तिथे प्रत्येक पदार्थ वेगवेगळ्या वेळेला येताे. आपलं खाऊन संपलं आहे का, दुसरा काेर्स मागवायचा आहे का, हे अन्न आवडलं का,की आवडलं नाही, आपलं जेवण बाकी आहे की व्हायचं आहे, हे सगळं वेटरला न सांगता समजण्यासाठी ही काटाचमच्याची भाषा वापरली जाते. बघा आणि लक्षात राहते का पाहा.