स्थानिक परदेशी पदार्थांच्या आस्वादाचा भारतीयांचा ‘ग्लाेकल’ ट्रेंड

05 Nov 2024 23:05:15
 
 
 

glocal 
माणसाची सगळी धावपळ चालते ती पाेटासाठी. जगण्यासाठी अन्न हवे असते आणि स्थानिक हवामान तसे भूगाेलानुसार आहारातील पदार्थ निश्चित हाेतात. विविध खाद्यपदार्थांची चव घेऊन पाहावीशी वाटणे ही नैसर्गिक भावना असते आणि खवय्ये त्यात आघाडीवर असतात.खाद्यपदार्थांच्या वैविध्याबाबत आपण भारतीय फार सुदैवी आहाेत. प्रत्येक राज्याची एक वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती आपल्याकडे दिसते.‘ग्लाेकल’ हा सध्याचा परवलीचा शब्द झाला असून, तंत्रज्ञानामुळे सगळे जग म्हणजे एक गाव हाेणे असा त्याचा अर्थ आहे. या नव्या जगात देशाेदेशींचे पदार्थ खाऊन पाहण्याची आवड वाढत असून, भाेजन अथवा आहार हा प्रवासाचा अविभाज्य भाग असल्याचे 45 टक्के भारतीयांचे मत आहे.
 
‘एसओटीसी ट्रॅव्हल’च्या सर्वेक्षणातून ही माहिती समाेर आली. सुटीचे नियाेजन करताना भारतीय प्रवासी कशाचा विचार करतात हे जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले हाेते. साईड डिशपासून जेवणातील मुख्य पदार्थांपर्यंत प्रवाशांना उत्सुकता असल्याचे त्यात दिसले.विविध पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटनाचा ट्रेंड वाढत असून, सुटीचे नियाेजन करताना आपण जाऊ इच्छित असलेल्या स्थळांवर काेणते पदार्थ मिळतात याची माहिती घेण्याचे प्रमाण वाढले आहे. किंबहुना स्थानिक पदार्थ हा प्रवासाचा एक मुख्य मापदंड झाल्याचे दिसते. ‘अगाेडा’च्या सर्वेक्षणानुसार, भारतीयांची सर्वाधिक पसंती थायलंडला असून, तुर्किये आणि लाओस यांचे क्रमांक त्यानंतर आहेत. भारतीय खाद्यपदार्थांचेही जगभरात आकर्षण असून, त्यांची चव घेण्यासाठी येणाऱ्या परदेशी पर्यटकांमध्ये व्हिएतनाम आणि जपानच्या प्रवाशांची संख्या जास्त आहे.
 
विविध चवींचे पदार्थ खाण्यासाठी प्रवास करणाऱ्यांची संख्या निम्म्यापेक्षा जास्त झाल्याचे ‘द वर्ल्ड फूड ट्रॅव्हल असाेसिएशन’चे म्हणणे आहे. एखादा खास पदार्थ खाण्यासाठी त्या जागी जाण्याचे नियाेजन करणाऱ्यांचे प्रमाण 53 ट्न्नयांवर पाेहाेचले असल्याचेअमेरिकेतील ‘जर्सी आयलंड हाॅलिडेज’ या पाेर्टलच्या आकडेवारीतून दिसते. आपण ‘फूड ट्रॅव्हलर’ असल्याचे सांगणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण 95 टक्के असल्याचेही आढळले आहे.बुकिंग.काॅम’चे भारत, श्रीलंका, इंडाेनेशिया आणि मालदीव या विभागाचे प्रमुख संताेष कुमार हे म्हणाले, ‘बाहेरगावी किंवा परदेशी गेल्यावर तेथील स्थानिक पदार्थ खाण्याची उत्सुकता 86 टक्के पर्यटकांना असते आणि त्या भागातील खास पदार्थांमागील परंपरा तसेच इतिहास जाणून घेण्याची उत्सुकता 76 टक्के पर्यटकांना असते. पर्यटनाचे नियाेजन करताना 48 टक्के भारतीय अन्नाला प्राधान्य देतात, तर पर्यटन स्थळाची निवड करताना अन्नाला प्राधान्य देणाऱ्यांचे प्रमाण 45 टक्के असल्याचे आम्हाला आढळले आहे.’
Powered By Sangraha 9.0