सध्या थंडीचे दिवस आहेत. आराेग्यासाठी हा ार उत्तम कालखंड मानला जाताे.प्रत्येकाला आपल्या आराेग्याची काळजी ही असतेच. मात्र, काळजी करणे वेगळे आणि काळजी घेणे वेगळे. केवळ काळजी केल्याने काही साध्य हाेत नाही. त्यापेक्षा काळजी घेतल्याने सारे काही साध्य हाेते. त्यामुळे चांगल्या आराेग्याच्या सवयी लावण्यासाठी हा काळ उत्तम आहे. आपल्यापैकी अनेक जणांना सकाळचा नाष्टा न करण्याची सवय असते. जितके जेवण महत्त्वाचे आहे तितकाच नाष्टा करणेदेखील गरजेचे आहे.मात्र, अनेक जण सकाळी उटले की एक-दाेन, तर कधी कधी तीन कप चहाच पितात. पण, काही खात नाहीत. हे चांगले नाही. नाष्टाकेल्याने रात्रीपासून रिकाम्या असलेल्या पाेटात चार घास पडतात व शरीराला ऊर्जा मिळते.
अर्थात, नाष्टा करताना आपण काय खाताे, हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. कारण, सध्या चमचमीत पदार्थांचा बाजारात माेठा सुकाळ आहे. गरमागरम वडा-पाव, मिसळ, कांदाभजी म्हणजे पाेषक नाष्टा नव्हे. कधीतरी बदल म्हणून असे पदार्थ खाण्यास काही हरकत नाही. मात्र, नंतर राेजच असे पदार्थ खाण्याची सवय लागते. जी शरीरासाठी चांगली नाही. त्यापेक्षा सिझनमधील काेणतीही फळे सकाळी खाणे कधीही चांगले. फळे महाग असतात अशी ओरड नेहमी केली जाते. मात्र, अन्य पदार्थांची तुलना केल्यास फळांची किंमत महाग वाटणार नाही. दाेन केळी, एखादे सफरचंद, पेरू, दाेन चिकू, एखादे डाळिंब, दाेन संत्री, दाेन माेसंबी यांची किंमत आणि अन्य चमचमीत पदार्थांची किंमत सेमच असते.