तडजाेडीसाठी काेणत्या गाेष्टींबद्दल साॅरी म्हणू नये!

    30-Nov-2024
Total Views |
 
 

life 
 
संसार म्हणजे तडजाेड. कधीही हेकेखाेरी आणि अहंकाराला धरून ठेवल्याने संसार नीट हाेत नाही. पती-पत्नीमध्ये वाद, मतभेद, भांडणे हाेतात. तशी हाेत नसतील तर पती-पत्नीच्या नात्याबद्दल विचार करावा अशी गंभीर स्थिती असू शकते. त्यामुळे वाद, मतभेद झाल्यावर एकाला माघार ही घ्यावीच लागते आणि त्यासाठी साॅरी या शब्दाचा आधार घ्यावा लागताे; पण या सततच्या साॅरीची सवय हाेऊन बसणं हेसुद्धा काही प्रमाणात चुकीचं आहे. एकदा आपल्याला समजलं, की माफी मागण्यानं सगळ्या समस्या तात्पुरत्या का हाेईना; पण सुटताहेत, की मग आपण छाेट्या-छाेट्या करणांवरूनही माफी मागायला लागताे. मग आपल्याला ती सवयच हाेऊन जाते. काही गाेष्टी या माफी मागण्यासाठी नसतात, तर त्या स्वतःसाठी करायच्या असतात आणि त्या केल्याबद्दल दाेषी वाटून घेण्यासारखं काहीही नाही. काही गाेष्टींसाठी कधीही जाेडीदाराची माफी मागू नका. उलट वाद हाेणार असतील, तर दाेघांनी मिळून त्यावर ताेडगा काढा. या गाेष्टींसाठी माफी मागू नका.
 
ध्येयवादी असण्यासाठी : आयुष्यात काेणतंही ध्येय असणं चुकीचं नाही. उलट डाेळ्यांसमाेर काही लक्ष्य ठेवून काम करत राहिलात, तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.त्यामुळे तुमच्या जाेडीदारासाठी तुमचं ध्येय बाजूला ठेवू नका. यामुळे तुम्ही आयुष्यात एक पाऊल मागे राहाल; पण करिअरकडे लक्ष देत असतानाच, तुमचं नातं फुलतंय ना याकडेही लक्ष द्यायला शिका.
 
तुमच्या भूतकाळासाठी : भूतकाळ हा काहीही झालं, तरी बदलता येत नाही.त्यामुळे तुमच्या भूतकाळातल्या गाेष्टींचा परिणाम तुमच्या सध्याच्या आयुष्यावर हाेऊ देऊ नका. ज्या गाेष्टी हाेऊन गेल्या आहेत, त्यांच्यासाठी माफी मागणं, हे चूकच आहे; कारण त्यानं गाेष्टी बदलत नाहीत, तर उलट आपल्याला माफी मागायची सवय लागते आणि त्यामुळे नात्यात अडथळा येताे.
 
मतभेदांसाठी : आयुष्यात काही गाेष्टींवर तुमची भिन्न मतं असू शकतात.प्रत्येकच गाेष्टीवर तुमचं एकमत झालं पाहिजे, असं नाही. तुमच्या गरजा तुम्ही उघडपणे सांगितल्या पाहिजेत. प्रत्येक माणूसवेगवेगळा असताे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जाेडीदारापेक्षा काही वेगळं वाटत असेल, तर त्यासाठी माफी मागायची गरज नाही. यात तुमचा स्वाभिमान कुठंही दुखावू नका.
 
अपेक्षा ठेवल्याबद्दल : तुम्हाला काेणत्याही गाेष्टीची अपेक्षा असते, तेव्हा त्यासाठी प्रत्येकच वेळी माफी मागण्याची गरज नाही. मात्र, याच अपेक्षा तुम्ही वेगळ्या प्रकारे व्यक्त करू शकता.‘साॅरी; पण आपण कधीच बाहेर जेवायला जात नाही, तुला वेळच नसताे’ यापेक्षा ‘तू मला मागच्या महिन्यात बाहेर जेवायला नेलंस, तेव्हा मला खूप छान वाटलं,’ अशाप्रकारे अपेक्षा व्यक्त केल्यास त्याचा वेगळा आणि चांगला परिणाम तुम्हाला बघायला मिळेल.
 
प्रामाणिक असण्यासाठी : ज्या नात्यात दाेघांनाही आपली मतं व्यक्त करता येत नाहीत, त्या नात्यात एकाची घुसमट ठरलेलीच असते; पण तुमचं स्पष्ट मत मांडण्यासाठी कधीही माफी मागू नका.जेव्हा तुमचा जाेडीदार चुकीचा असेल, तेव्हा त्याला त्याची चूक जरूर जाणवून द्या आणि त्यासाठी त्याची माफी मागण्याची गरज नाही.प्रामाणिकपणानं तुमच्या नात्याचा पाया भक्कम व्हायला मदत हाेते.