हाऊस हजबंड व्हायला काय हरकत आहे?

    29-Nov-2024
Total Views |
 
 
 

wife 
जेव्हा हाऊस हजबंडचा विषय येताे तेव्हा कामाची िफफ्टी िफफ्टी विभागणी माेठा मुद्दा हाेत असताे आणि घरात तणावाची स्थिती तयार हाेऊ लागते. जर पुरुष बाहेर काम करीत नसेल तर शेजारी व नातलग ताे बाहेर काम का करीत नाही यात विशेष रस घेत असतात आणि काेणतेही उत्तर न मिळाल्यास मन दुखावेल असे काहीतरी बाेलून जात असतात.अशा स्थितीत पत्नीने आपल्या पतीला शांतपणे समजावून जाेवर ताे बाहेर काम करीत नाही ताेवर संयमाने वागायला सांगावे. तसेच पतीनेही जर ताे बाहेर काम करू शकत नसेल तर घरीच महिला करतात तशी मुलांच्या देखभालीसाेबतच इतर कामेही व्यवस्थित करावी. जर महिला गृहिणी बनून मुलांची देखभाल करू शकते व घरातील कामे करू शकते तर हीच कामे पुरूष का करू शकत नाही. वास्तविक आपण विकासाच्या अशा टप्प्यावर पाेहाेचलाे आहाेत की, जिथे घरात काेण आहे व बाहेर पैसे कमवायला काेण जाते आहे यामुळे काेणताही फरक पडत नाही.
 
आजकाल समाजात महिलाही पुरुषांच्रूा खांद्याला खांदा भिडवून चालू लागल्या आहेत त्यामुळे समाज फक्त पुरूषप्रधान राहिलेला नाही. पण भूमिका बदलल्यामुळे सारे खूश आहेत का हाच प्रश्न आहे.समाजात आजही पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त सुरक्षित वातावरणात वाढवले जात आहे.अशा घरातील महिला स्वत:ला घराबाहेर पडून कमाई करण्यापेक्षा घरीच राहून स्वयंपाकपाणी करण्यात जास्त सुरक्षित मानतात. तसेच मुलांना त्यांनी घरी राहून चूल आणि मूल सांभाळण्याच्या दृष्टिकाेनातून वाढवले जात नाही. तसेच मुली कितीही स्वतंत्र झाल्यातरी आपण हाेममेकरही आहाेत असे त्यांना वाटत राहते.कदाचित यामुळेच महिला नाेकरीसाठी बाहेर पडण्यापूर्वी घरातील कामे करून जात असतात. याउलट पुरुषांना नाेकरीसाेबत घराची जबाबदारी दिली तर ते ती पार पाडू शकत नाहीत.जर आपण हाऊस हजबंड असाल तर घरात तणाव टाळण्यासाठी काही गाेष्टी कायम लक्षात ठेवा.
 
 घरात जे काम आपण करू इच्छित आहात ते शांत डाेक्याने व उत्तम प्रकारे करायला हवे. जेणेकरून आपल्या पत्नीला काेणताही त्रास जाणवणार नाही.
 
 प्रत्येक गाेष्ट आपल्या नियंत्रणात ठेवावी. भले ती घराशी संबंधित असाे वा जीवनातील एखाद्या मुख्य निर्णयाशी.
 
 जर आपली पत्नी 9 ते 5 ची शिफ्ट करीत असेल तर जेव्हा ती कामावरून परतेल तेव्हा एक कप चहा बनवून पाजण्यात कसलीही लाज नसावी.यामुळे आपुलकी जाणवते आणि संबंधही मधून हाेतात.
 
 जरी आपण बाहेर काम करीत नसाल तरी बाहेरच्यांना आपण बाहेर काम करीत नाही हे जाणवून देऊ नये.