मूल नकाेच असलेल्या तरुण दांपत्यांची संख्या वाढत आहे

29 Nov 2024 22:35:27
 
 
संध्यानंद.काॅम
 

thoughts
 
 
वंशसातत्य हा विवाहाचा एक हेतू असताे. आपल्यानंतर आपल्या घराण्याचे नाव पुढे राहावे म्हणून विवाहानंतर मुले हाेणे महत्त्वाचे मानले जाते. ‘हम दाे-हमारे दाे’ ही घाेषणा अनेकांना आठवत असेल. नंतर ‘हम दाे-हमारा एक’ अशी अलिखित स्थिती आली आणि आता तर ‘हम दाे-हमारा एक भी नही’ अशी अवस्था येऊ लागली आहे. मूल हाेऊ देणे ही नवीन पिढीची गरज उरलेली नाही. भरपूर उत्पन्न असलेली दांपत्ये आता मूल नकाे असा निर्णय करतात.अशांचा उल्लेख ‘डबल इन्कम, नाे किड्स’ (ड्निंस) असा केला जाताे. पण, त्यामुळे नवीन पिढी जन्माला येणे कमी हाेत असून, एकटे राहणारे वाढायला लागल्याने अनेक देशांपुढे नवीनच समस्या येऊ लागल्या आहेत. भारतातही ‘ड्निंस’ दांपत्ये वाढत असल्याचे दिसते. दिल्लीतील कल्पना आणि मनीष (नावे बदलली आहेत) हे तरुण दांपत्य एका आयटी कंपनीत काम करते.
 
त्यांचे उत्पन्न चांगले आहे. विवाहाला बारा वर्षे झाली तरी त्यांना मूल नाही. त्याबाबत विचारले, तर ‘आम्हीच अद्याप मुले आहाेत.आम्हाला जग फिरावयाचे आहे, आमचे आयुष्य जगावयाचे आहे,’ असे उत्तर मिळते. पण, हाच प्रश्न पुन्हा केल्यावर मनीष हे म्हणतात, ‘आम्हाला काेणत्याही जबाबदारीत गुंतावयाचे नाही. आमच्या करिअरमध्ये प्रगती करून लवकर निवृत्त हाेण्याचा आमचा विचार आहे.’ नाेएडातील भाव्या मिश्रा यांचे मत काहीसे असेच आहे. ‘माझ्यासाठी करिअर हेच सर्वस्व आहे.मी लग्न केले, तरी मुलांची जबाबदारी घेणे मला जमणार नाही,’ असे त्या स्पष्ट करतात. कायदे सल्ल्याच्या क्षेत्रातील एका फर्ममधील कर्मचारी अरुणीमा बन्सल या म्हणाल्या, ‘क्षमता आणि ऊर्जेचा वापर अन्यत्र करण्याची माझी इच्छा आहे. आम्हाला काका-काकू हाेणे आवडते, पण बाळाच्या संगाेपनात 24 तास गुंतून राहण्याची आमची इच्छा नाही.
 
’ सुदैवाने भारतात असा विचार करणारे सध्या तरी कमी आहेत. जपान, दक्षिण काेरियासारखे आशियाई देश आणि युराेपीय देशांमधील या विचारांचे परिणाम समाेर येऊ लागले आहेत. या देशांत एकटे राहणारे आणि एकटेच राहू इच्छिणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार, मिलेनियल आणि जनरेशन झेडमधील दर चारपैकी एकाला मूल नकाे असल्याचे आढळले आहे. तरुणाईच्या पसंतीचा साेशल मीडियाही त्याला अपवाद नाही.‘रेडिट’ नावाच्या एका प्लॅटफाॅर्मवर ‘ग्लाेबल चाइल्ड फ्री’ नावाचा एक ग्रुप असून, त्याचे 15 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. नावाप्रमाणेच या ग्रुपमधील सदस्य मूल नसण्याचे समर्थन करतात आणि अनुभवही शेअर करतात. यामुळे त्यांना आई-वडिलांबराेबरच इतरांकडूनही टीका सहन करावी लागते, काहींनी ‘ऑनलाइन हेट’चा सामना करावा लागताे.
 
मात्र, तरीसुद्धा एकटे राहणे या लाेकांना पसंत आहे. ‘चाइल्ड-फ्री’ हा शब्द 1990पासून अस्तित्वात असला, तरी आता त्याचा वापर वाढताेय. हा एक फार माेठा सामाजिक बदल असून, त्यातून समाजाची भविष्यातील रचना बदलू शकते. हे का घडते आहे ते समजून घेतले पाहिजे.स्वत:कडे जास्त लक्ष ‘प्यू रिसर्च सेंटर’ने नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार, मूल नकाे असलेल्या प्राैढांची संख्या अमेरिकेत वाढत आहे. गेल्या वर्षी अशांचे प्रमाण 47 टक्के हाेते. मात्र, मूल नकाे असण्याची कारणे भिन्न आहेत. बाळाच्या संगाेपनाचा खर्च न पेलण्याची भीती 12 ट्न्नयांना वाटते, तर भविष्यातील जगाबाबात चिंता असल्याने 13 ट्न्नयांना मूल नकाे आहे. जागतिक स्थिती आणि पर्यावरणाचा नाश ही कारणे या लाेकांनी सांगितली.
 
अन्य एका सर्वेक्षणात सहभागी झालेल्या जनरेशन झेडच्या 59 टक्के प्रतिसादकर्त्यांना आगामी पाच वर्षांत स्वत:च्या आराेग्याकडे जास्त लक्ष द्यावयाचे असल्याने मूल नकाे आहे. सध्याचे नाते जपताना अनेक समस्या येत असताना मूल हवे कशाला? असा त्यांचा प्रश्न असताे. कारणे काहीही असली, तरी या निर्णयाचे परिणाम दिसायला लागले आहेत. ज्येष्ठांची वाढती आणि तरुणांची घटती संख्या हा त्यातील मुख्य कारण.दिसायला लागले आहेत परिणाम ‘मूल नकाे’ या विचाराचे परिणाम आता दिसायला लागले आहेत. मुलांअभावी चीनमधील हजाराे बालवाड्या (किंडरगार्टन) बंद झाल्या आहेत. एका वृत्तानुसार, त्या देशात गेल्यावर्षी 14,808 किंडरगार्टन बंद झाल्या. सतत घटत असलेल्या जन्मदरामुळे हे घडले आहे. अशीच स्थिती जपानची आहे.
 
तेथे गेल्या चार वर्षांत प्रसूतीगृहांची (बर्थ सेंटर) संख्या 39.5 ट्न्नयांनी घटली आहे. अशीच स्थिती राहिली, तर हाँगकाँग आणि दक्षिण काेरिया यांच्यावर ज्येष्ठांच्या वाढत्या संख्येचा वाढता बाेजा पडेल. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, 2050पर्यंत जगात 65 वर्षांवरील ज्येष्ठांची संख्या पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांपेक्षा दुप्पट आणि बारा वर्षांच्या मुलांबराेबर हाेईल. भविष्यात तरुण वर्गाची संख्या कमी हाेऊ नये म्हणून दक्षिण काेरियातील एक कंपनी मूल जन्माला घालणाऱ्या दांपत्यांना भक्कम बाेनस देत आहे. ‘मूल नकाे’ हा पाश्चात्त्य विचारसरणीचा प्रसार असल्याचे जाहीर करून या विचाराचे समर्थन करणाऱ्यांना चार हजार डाॅलरचा दंड ठाेठावणे रशियाने सुरू केले आहे.
 
Powered By Sangraha 9.0