क्राॅप सर्कल्स

29 Nov 2024 22:45:26
 
 

maze 
 
हे गुंतागुंतीचे जाॅमेट्रिक पॅटर्न गव्हाच्या शेतांमध्ये बनवलेले दिसतात. काहींच्या मते हे परग्रहवासीयांची अंतराळयाने जमिनीवर उतरल्यामुळे तयार झालेल्या खुणा आहेत वा ते परग्रहवासी पृथ्वीवासीयांसाठी साेडून गेलेला एखादा संदेश असावा. एका अन्य थिअरीनुसार वादळी वा चक्रीवादळी वाऱ्याने पिके दबल्यामुळे अशा प्रकारच्या आकृत्या तयार हाेतात पण नियमितपणे व एवढ्या स्पष्टपणे तयार हाेणारे क्राॅप सर्कल वाऱ्याने तयार हाेणे अशक्य आहे. याचे सर्वांत पटणारे कारण असेही सांगता येऊ शकते, की काही लाेकांनी रहस्य उत्पन्न करण्यासाठी ही स्वत: तयार केली असतील. ज्यासाठी ते दाेऱ्या व लाकडी फळ्यांसारख्या काही साध्या वस्तूंचा वापर करीत असतील.
 
 
Powered By Sangraha 9.0