फिटनेससाठी झुंबा आहे जबरदस्त

28 Nov 2024 22:43:47
 
 

zumba 
झुंबासाठीही अनेक लाेक जिमला जाणे पसंत करतात. परंतु जिमच्या उपकरणांवर आणि मशीनवर त्याच त्या पारंपरिक पद्धतीने वर्कआउट करणे फिटनेसप्रेमींसाठी माेठ्या प्रमाणावर कंटाळवाणे ठरते. आता त्यांना आपले फिटनेस लक्ष्य गाठायला काहीतरी विविधता, उत्साह आणि मनाेरंजन असलेले असे एखादे टे्निनक हवे असते.झुंबाचा आविष्कार 90च्या दशकात एक फिटनेस प्रशिक्षक अल्बर्टाे बेटाे पेरेज यांनी केला. हा ऊर्जेने परिपूर्ण असा एराेबिक फिटनेस प्राेग्रॅम आहे, जाे दक्षिणी अमेरिकी डान्स शैलीपासून प्रेरित आहे. यात आपल्या पायांच्या पंज्यावर उभे राहून हिपहाॅप आणि सालसाच्या मस्तीभऱ्या बिट्सवर आपली बाॅडी मूव्ह करायची असते. उत्साह आणि फिटनेस यासाठी केला जाणारा झुंबा हा मुख्यत्वे ग्रुपने केला जाताे.
 
झुंबा हा वेगाने केला जाणारा डान्स प्रकार असल्याने हा ट्रेडमिलवर धावणे किंवा क्राॅस ट्रेनरवर वेळ घालवणे अशा वर्कआउटपेक्षा वेगाने फॅट बर्न करताे.झुंबामुळे लवचिकपणा वाढताे. झुंबा एक कार्डिओव्हॅस््नयुलर ए्नसरसाइज आहे, जी वेगात आणि मध्यम अशा गतीने केली जाते आणि इंटरवेल ट्रेनिंगसारखे काम करते. त्यामुळे प्रत्येक मांसपेशी खासकरून पाेट आणि पाठ यावर अधिक परिणामकारक ठरते. झुंबाचे परिणाम एवढेच सीमित नसून ताकदीने परिपूर्ण असलेल्या या वर्कआउटचा दुसरा फायदा हा आहे, की हा सगळ्या मांसपेशींना सक्रिय करताे आणि पूर्ण शरीराला फिट राखायला मदत करताे.फिट राहण्यासाठी 5 ते 65 वर्षांपर्यंत काेणीही व्यक्ती झुंबा करू शकताे.
Powered By Sangraha 9.0