घरच्या भांडणाचा हाेताे ऑफिसच्या कामावर परिणाम

27 Nov 2024 22:31:11
 
 

office 
 
जर्नल ऑफ एप्लाइड सायकाेलाॅजीत प्रकाशित अलीकडील अध्ययनानुसार घरात हाेणारे भांडण, ऑिफसात व्यक्तीची ऊर्जा व भावना प्रभावित करीत कामावर निगेटिव्ह परिणाम टाकू शकते. पण, अध्ययनात एक मजेशीर गाेष्ट समाेर आली ती ही की घरगुती पातळीवर तणावाने झुंजणारे वा भांडणानंतर काही कर्मचारी ऑिफसात आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरगुती चिंता दूर करण्यास जास्त मदत करतात.हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूत प्रकाशित या लेखानुसार अध्ययनात विशेष जाेर यावर हाेता की, लाेक कसे वाईट अनुभवांचा सामना करीत कार्यक्षेत्राततणावापासून दूर राहू शकतात. आणि मॅनेजर कशाप्रकारे तणावाशी झुंजणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपला सपाेर्ट देऊ शकतात. सविस्तरपणे झालेल्या या अध्ययनात अनेक दिवसांपर्यंत कर्मचाऱ्यांच्या व्यवहाराचा अभ्यास केला गेला व त्यांना प्रश्न विचारले गेले.
 
सामान्यत: मानले जाते की, मूड खराब असल्यास व्यक्ती इतर लाेकांना कमी सहकार्य करते. याउलट अध्ययनात काम वा घराशी संबंधित तणावात सहकर्मचारी इतर कर्मचाऱ्यांना जास्त मदत करताना दिसतात. एवढेच नव्हे तर इतरांना मदत केल्यानंतर मिळालेल्या आनंदामुळे ते उत्तम मूडमध्ये घरी परततात.मदत केल्यामुळे आपले इतरांशी नाते उत्तम हाेते.इतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या समस्यांमध्ये मदत करणे व्यक्तीला स्वत:च्या चिंतांचा सामनाही उत्तमप्रकारे करण्यस प्रेरित करते. पण अध्ययनात असे सांगितले आहे की, मूड खराब असल्यास कर्मचारी एकमेकांना त्यांच्या वैयक्तिक समस्यांमध्येही मदत केल्यास आनंदी हाेता. तसेच वरिष्ठांसाठीही तणावग्रस्त कर्मचाऱ्यां भावनिक आधार देऊन वातावरण कामावर परिणाम करणर नाही असे सकारात्मक ठेवायला हवे.
Powered By Sangraha 9.0