रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी येथे दीक्षाभूमीला भेट दिली आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. ऑल इंडिया एससी, एसटी, रेल्वे एम्प्लाॅईज असाेसिएशनच्या वार्षिक संमेलनासाठी रेल्वेमंत्री येथे आले हाेते. विधानसभा निवडणुकीसाठी रेल्वेमंत्री भारतीय जनता पक्षाचे सहप्रभारी हाेते. ऐन निवडणुकीच्या काळात त्यांचा नागपूर आणि रायपूर दाैरा हाेणार हाेता. परंतु, ताे रद्द करण्यात आला. त्यानंतर दाेन दिवसांपूर्वी पुन्हा त्यांचा नागपूर दाैरा ठरला. एससी, एसटी, रेल्वे एम्प्लाॅईज असाेसिएशनच्या वार्षिक संमेलनासाठी ते विशेष विमानाने दिल्लीहून नागपुरात दाखल झाले.संमेलनानंतर त्यांनी दीक्षाभूमीला भेट देत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी, नागपूरच्या सदस्यांनी रेल्वेमंत्र्यांचे स्वागत केले.