मध्य प्रदेश येथील मंदिरांवर कामक्रीडेतील अनेक शिल्पे पाहायला मिळतात. या मंदिरांचे आरेखन आणि डिझाईन देखील वैशिष्ट््यपूर्ण आहे. इसवी सन पूर्व 950 ते 1050 या कालावधीत चंडेला राजघराण्याने ही मंदिरे बांधल्याचे सांगितले जाते. छत्तरपूर जिल्ह्यापासून अवघ्या 50 किलाेमीटर अंतरावर खजुराहाे मंदिर आहे. तिथे 20 लाखांहून अधिक देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. बाहेरच्या भिंतींवर एकाहून एक सुबक मूर्ती काेरण्यात आल्यात. काहींमध्ये प्रेयसीच्या भेटीचा आनंद दिसून येताे, तर काहींमध्ये प्रियकरापासून विभक्त हाेण्याचे दुःख दिसते. काही मूर्तींमध्ये प्रियकर व प्रेयसी आलिंगन देत आहेत, तर काहींमध्ये सहवासाची मुद्रा आहे.