महिलांनी िफट राहण्यासाठी हे करा...

27 Nov 2024 22:36:11
 
 

Health 
 
आजच्या व्यस्त जीवनशैलीत महिला स्वतःकडे लक्ष द्यायला विसरतात. अनेक महिला नाेकरदार असून त्या काम आणि घर यांचा ताळमेळ साधत असतात.
 
अन्न चावून खा: अन्न चावून चावून खा. यामुळे अन्न सहज पचण्यास मदत हाेते. परिणामी अपचनाच्या त्रासापासून मु्नती हाेते. जास्त प्रमाणात खाणं राेखायचं असेल तर हा साेपा आणि प्रभावी उपाय आहे. दिवसभराच्या कामांची यादी बनवा. तणावाला दूर ठेवण्यासाठी हा सगळ्यात प्रभावी उपाय आहे. कामांचा प्राधान्यक्रम ठरवा आणि त्यानुसार कामं करा. एकानंतर एक काम करत जा.एकाच वेळेस अनेक कामं लक्षात ठेवता येत नाही. यामुळे तणाव येताे. यामुळे डाेकेदुखी, नैराश्य आणि उच्च र्नतदाब यांसारख्या तणावाशी संबंधित आजारांचा सामना करावा लागताे.
 
वेळेवर जेवण करा: निराेगी शरीरासाठी याेग्य आहार घेणं खूप आवश्यक आहे. त्याचबराेबर वेळेवर जेवण करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. आपण दरराेज काय खाताे, यावर आपलं आराेग्य अवलंबून असतं. हेक्टिक जीवनशैलीत जर तुम्ही तुमच्या आहाराकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर आजार काेसाे दूर राहतील. राेजच्या आहारात त्या सगळ्या पदार्थांचा समावेश करा, ज्यामध्ये फळं, भाज्या, दुग्धजन्य उत्पादनं, मटण, मासे आणि अन्य प्रथिनयु्नत पदार्थांचा समावेश असेल.
 
वजनावर नियंत्रण: वजनावर नियंत्रण ठेवा. खरंतर आपलं वजन वय, अनुवंशिकता, लिंग आणि उंची यावर अवलंबून असतं. अधिक वजनामुळे उच्च र्नतदाब, हृदयाशी संबंधित आजार, मधुमेह, वेगवेगळ्या प्रकारचे कर्कराेग आणि अन्य प्रकारच्या आजारांना आमंत्रण मिळतं.
Powered By Sangraha 9.0