हिवाळ्यातही शरीरात उष्णता कायम ठेवा

    26-Nov-2024
Total Views |
 
 

winter 
 
 
हिवाळ्यात केवळ उबदार कपडे घालून भागणार नाही. तुमच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करायला हवा, ज्यामुळे शरीरात उष्णता निर्माण हाेईल. या सगळ्या गाेष्टी आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असतात. आराेग्याबराेबर चविष्टही असतात! राेगप्रतिकारक क्षमतेसाठी मध सर्दी-खाेकल्यामध्ये एक चमचा मध खाण्याचा सल्ला दिला जाताे. हिवाळ्यात मधाचे सेवन करण्याने राेगप्रतिकारक क्षमता वाढते. थंडीपासूनही बचाव हाेताे. मधामध्ये नैसर्गिक गाेडवा असल्यामुळे साखरेऐवजी तुम्ही मधाचा वापर करू शकता. यामध्ये कॅलरीजही कमी असतात.
 
वात, पित्त-कासाठी हिरवी मिरची हिरव्या मिरचीचा तिखटपणा शरीराचे तापमान वाढविण्यासाठी सहाय्यक ठरताे.म्हणून हिवाळ्यात शरीराला उष्ण ठेवण्यासाठी हिरवी मिरची अवश्य खा. यामुळे वात, पित्त आणि कामध्ये ायदा हाेताे.परिपूर्ण डाळिंब डाळिंबामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात.तसंच ‘क’ जीवनसत्त्व आणि पाॅलीिफनाॅलही आढळते. ज्यामुळे र्नत शुद्ध हाेते. सर्दी आणि तापापासूनही बचाव हाेताे. धमन्यांमधील अडथळा दूर करण्यासाठीही डाळिंब सहाय्यक ठरते. म्हणून दरराेज डाळिंब खा.दालचिनी आणि लवंग दालचिनी आणि लवंग शरीरात उष्णता निर्माण करते. ज्यामुळे थंडीशी लढण्यास मदत हाेते. पदार्थांबराेबरच चहा किंवा काॅीमध्ये मिसळूनही तुम्ही या दाेन्ही घटकांचं सेवन करू शकता. दालचिनी मधुमेह नियंत्रित करते. तर लवंगेचा रस दात आणि ताेंडाच्या आजारांपासून बचाव करते.
 
हाडांसाठी पेरू आंबट फळांप्रमाणे पेरूमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते. जे राेगप्रतिकारक क्षमता वाढविते. यामध्ये मॅग्नेशियम आणि पाेटॅशियम असते, जे हाडांना मजबूत करते. पेरू हृदयासाठीही उत्तम ठरताे.उष्णता प्रदान करतात आंबट फळं आंबट फळांमध्ये ‘क’ जीवनसत्त्व आणि फ्लेवाेनाॅइड्स आढळतात, जी राेगप्रतिकारक क्षमतावर्धक असतात. शरीरास गरम राहण्यास मदत करतात. यामध्ये चांगल्या काेलेस्ट्राॅलचे प्रमाण अधिक असते. संत्रं या दिवसात भरपूर खा.उष्णतेसाठी लसूण अधिक काेलेस्ट्राॅल असणाऱ्या व्यक्तींना लसूण खाण्याचा सल्ला दिला जाताे. पण, हिवाळ्यात लसणाचे सेवन करण्याने शरीरातून आतून उष्णता मिळते. यामध्ये अँटिबॅक्टेरिअल गुण आढळतात. जे शरीरास बॅक्टेरिया आणि व्हायरसच्या हल्ल्यापासून वाचवितात. घशामध्ये खवखव झाल्यास लसणाच्या 2-3 कच्च्या पाकळ्या खा.