आनंदी राहण्यासाठी शांत झाेप व याेग अत्यावश्यक

    25-Nov-2024
Total Views |
 
 
 

yoga 
झाेपही गाेड असते आणि याेगातही रस असताे. या दाेन्हींचा संबंध आपल्या आनंदाशी आहे. जर व्यवस्थित झाेप आली व गाढ झाेपेतून उठलाे तर झाेपेचा गाेडवा जाणवताे. याप्रमाणेच याेगही जर व्यवस्थित केला तर जीवनात रस भरताे. गाेडी जर रसाळ असेलतर आनंद अधिक वाढताे. झाेप जर व्यवस्थित पूर्ण झाली नाही तर जागे झाल्यानंतर अस्वस्थता जाणवते. व्यक्तिमत्त्व दिवसभर त्रस्त राहते, पण झाेपेबाबत एक दक्षता अवश्य पाळा. जास्त झाेपही अशांत करू शकते व कमी झाेपही त्रास निर्माण करू शकते. असेच याेगाबाबतही आहे. अनेक जण म्हणतात की, याेग केल्यानंतर विचित्र अस्वस्थपणा जाणवताे. असे हाेत असते पण याला घाबरून याेग करणे साेडू नये.
 
वास्तविक ती अस्वस्थता आपण याेग्य मार्गावर असल्याचे दर्शवीत असते. एखादा नशा केलेला माणूस कचऱ्याच्या ढिगावर पडला, रात्रभर पडून राहिला तर ताे कचऱ्याची मजा लुटत असताे. जेव्हा सकाळी नशा उतरते तेव्हा ताे मी काेठे पडलाे हाेताे असा विचार करून अस्वस्थ हाेताे. खरे तर याेग आपण दीर्घकाळापासून पांघरून असलेली नशा नष्ट करताे आणि त्यामुळेच याेगा केल्यानंतर थाेडीशी अस्वस्थता जाणवत असते. त्यामुळे याेग सातत्याने करण्यातच त्याचा रस आहे. आनंदी राहण्यासाठी गाेड झाेप व रसाळ याेग अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा हे दाेन्ही मिळतात तेव्हा खरा आनंद जाणवू लागताे