पिण्याच्या पाण्याची सर्वांत जास्त भीती झाम्बियामध्ये, तर सर्वांत कमी सिंगापूरमध्ये

25 Nov 2024 17:48:26
 
 
 

water 
 
जगातील अर्ध्यापेक्षा जास्त (52.3%) लाेकांना पिण्याचे पाणी शुद्ध असण्यावर विश्वास नाही. बहुतांश लाेक बाटलीबंद मिनरल वाॅटर आणि कार्बाेनेटेड ड्र्निंसचा वापर करतात.ते पर्यावरण आणि आराेग्यासाठी हानिकारक आहे. नेचर कम्युनिकेशन्स मासिकात प्रकाशित संशाेधनानुसार पिण्याच्या पाण्याविषयी सर्वांत जास्त भीती झाम्बियात, तर सर्वात कमी सिंगापूरमध्ये आहे. नाॅर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी आणि चॅपल हिलची युनिव्हर्सिटी ऑफ कॅराेलिना यांच्या संशाेधनात म्हटले आहे, की अमेरिकेसारख्या विकसित देशात, जिथे पाण्याची पुरेशी उपलब्धता आहे, तिथेही 39% लाेकांना कमी वेळात पिण्याच्या पाण्यापासून गंभीर नुकसान हाेण्याची शंका वाटते.
 
असुरक्षित पाण्यामुळे नैराश्याचा धाेका : संशाेधनाच्या वरिष्ठ लेखिका सेरा यंग यांनी म्हटले आहे, की असुरक्षित पाण्याच्या संपर्कात ेणाऱ्या लाेकांना मानसिक तणावाचा सामना करावा लागताे. त्यांच्यात नैराश्याचा धाेका जास्त असताे. मुख्य रूपाने महिला, शहरवासी आणि जास्त शिक्षित लाेकांमध्ये पाण्यापासून हाेणाऱ्या नुकसानाची शंका जास्त असते.
 
कसे केले संशाेधन : हे ख़संशाेधन सन 2019 लाॅयड्स रजिस्टार फाउंडेशन वर्ल्ड रिस्क पाेलद्वारे 141 देशांच्या 1,48,585 ज्येष्ठांच्या राष्ट्रीय प्रतिनिधी डेटाचा उपयाेग करून केले गेले. लाेक पिण्याच्या पाण्याच्या धाे्नयाला समजू शकत नाहीत. कारण अनेक प्रदूषण करणारे घटक रंगहीन, चव नसलेले आणि वास नसणारे असतात.
Powered By Sangraha 9.0