उच्च पदावर जाण्यासाठी आवड आणि जिद्द यांचीही आवश्यकता

25 Nov 2024 17:45:32
 
 

thoughts 
 
बाैद्धिक क्षमतांबराेबरच भावना जसे आवड आणि जिद्द असणे अभ्यासात प्रथम येण्यासाठी आणि उच्च पद मिळविण्यासाठी आवश्यक आहे. केवळ पुस्तके वाचून अभ्यासात पहिला क्रमांक किंवा उच्च पद मिळत नाही. अभ्यासू असण्याबराेबरच जिद्द आणि आवड असणे अतिशय आवश्यक आहे, असा दावा नवीन संशाेधनात करण्यात आला आहे. मार्गात सतत येणाऱ्या अडचणींमुळे ध्येयापर्यंत पाेहाेचण्याचे उद्दिष्ट साेडण्याऐवजी त्याला पूर्ण करण्याचा दृढ निश्चय करणे आवश्यक आहे.
 
बुद्धिवान हाेण्यात भावनांची महत्त्वाची भूमिका:सख्ख्या भाऊ- बहिणींमध्येसुद्धा अभ्यासाविषयी एकसमान गुण नसतात. अभ्यास करणे किंवा न करणे, मुलांचा स्वभाव किंवा भावना यावर अवलंबून असते. अभ्यासात यासाठी वातावरण आणि जीन हेसुद्धा महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले आहे. खूप पूर्वीपासून असे सांगण्यात येते की, जन्मजात गुण असल्यासच मुले हुशार हाेतात आणि अभ्यासात पुढे येतात, तर दुसरी मुले मागे राहतात; पण नवीन संशाेधन या समजुतीला पूर्णपणे नाकारते.अध्ययनानुसार मुलांमध्ये प्रेरणा, स्वयंनियमन, जिद्द आणि दृढ निश्चय अभ्यासात चांगली कामगिरी करण्यासाठी आवश्यक आहेत.
 
वातावरणाचाही परिणाम दिसून आला: इंग्लंड आणि वेल्समध्ये सात-16 वर्षांच्या वयाच्या 10,000 मुलांवर हे संशाेधन करण्यात आले.त्यामध्ये सख्खे बहीण-भाऊसुद्धा हाेते. त्यानुसार मुलांमधील भावना, अनुवंशिकता, त्यांचे वातावरण आणि अभ्यासातील कामगिरीचा अभ्यास करण्यात आला. जर्नल नेचर ह्यूमन बिहेवियरमध्ये प्रकाशित या संशाेधनात सांगण्यात आले की, बाैद्धिक क्षमतांबराेबरच भावना जसे आवड आणि जिद्द असणे अभ्यासात प्रथम येण्यासाठी आवश्यक आहे.
 
लंडनमधील ्नवीन मॅरी काॅलेजच्या डाॅ्नटर मार्गरिटा यांच्याबराेबर हे संशाेधन करणाऱ्या लंडनयुनिव्हर्सिटी ऑफ काॅलेजच्या डाॅ. एंड्रिया एल्लग्रिनी यांनी सांगितले की, ‘दीर्घ काळापासून चालत आलेली मान्यता, अभ्यासात यश मिळविण्यासाठी बुद्धिमान असणे पहिली अट आहे. याला आमच्या संशाेधनाने आव्हान दिले आहे.’ खेळांमध्ये प्रवीण मुले अभ्यासातही पुढे ः खेळात सक्रिय असलेली मुले अभ्यासातही पुढे असतात. भारतातील 6,988 मुलांवरील एका शाेधात ही बाब नुकतीच समाेर आली. संशाेधनात म्हटले आहे की, खेळांमुळे मेंदूत र्नताचा प्रवाह वाढताे; ज्यामुळे मुले प्रत्येक क्षेत्रात सक्रिय राहतात.त्यांच्यात त्वरित निर्णय घेण्याची क्षमता तयार हाेते.
Powered By Sangraha 9.0