भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात त्रिपुरीपौर्णिमेनिमित्त दीपोत्सव व तुळशी विवाह

19 Nov 2024 14:07:15
 
 
bh
 
पुणे, 18 नोव्हेंबर (आ.प्र.) :
 
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव, तुळशी विवाह आणि 56 भोगचा नैवेद्य करण्यात आला. यावेळी विविध पंच पक्वान आणि फळांची आरास बाप्पासमोर साकारण्यात आली होती. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टने नेहमीप्रमाणे सामाजिक भान राखून बाप्पाला दाखविण्यात येणाऱ्या नैवद्यातील सर्व मिठाई, फराळ आणि फळे सामाजिक संस्थांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दत्तवाडी येथील देवतारू आश्रम आणि मुळशी खोऱ्यातील कातकरवस्तीवरील 300 विद्यार्थ्याना शिक्षण देणाऱ्या आणि दररोज 90 मुलांना जेवण पुरविणाऱ्या पौड येथील ‌‘डोनेट ऐड' संस्था आणि भाजे येथील बालग्राम केंद्र या सर्वांना हे सर्व नैवेद्यचे पदार्थ देण्यात येणार आहेत.
 
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात दिवे लावून फुलांनी सुंदर सजावट करण्यात आली होती. काचेच्या ग्लासमधील दिव्यांनी संपूर्ण मंदिर उजळून निघाले होते. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. ट्रस्टचे सर्व पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0