कांबळीचे दात त्याच्याच घशात घातले

    18-Nov-2024
Total Views |
 
 
 

kambli 
विनाेद कांबळी आणि सचिन तेंडुलकर हे क्रिकेटच्या मैदानावरचे दाेस्त. दाेघांना एकत्र संधी मिळाली. सचिनने संधीचं साेनं केलं.
कांबळी ते करू शकला नाही. संजय मांजरेकर हाही मुंबईचाच खेळाडू, या दाेघांना थाेडा सीनियर. हे तिघेही 1992च्या भारतीय वर्ल्ड कप संघात हाेते. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मांजरेकर आणि सचिन खेळत हाेते. विनाेदला संधी मिळायची हाेती. त्याचा मूड ऑफ हाेता. प्रत्येक मॅचमध्ये मांजरेकर आणि तेंडुलकर बॅटिंग करून आले की, विनाेद रूममध्ये भेटल्यावर त्यांना सतत टाेकायचा, टीका करायचा. तू इतक्या भिकार बाेलिंगला ठाेकलं का नाहीस? इतक्या वाईट बाॅलवर आऊट का झालास? अशा प्रकारचे प्रश्न विचारून त्यांना भंडावून साेडायचा.
 
झिंबाब्वेच्या विराेधातली एक मॅच तर मांजरेकर आणि तेंडुलकर यांच्या बॅटिंगने जिंकून दिली हाेती. तरीही विनाेद टीका करतच हाेता. लवकर टार्गेट का पूर्ण केलं नाही म्हणून? सचिनने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की, टार्गेट छाेटं हाेतं म्हणूनच सावध खेळलाे आम्ही. अखेर भारत पाकिस्तान मॅचमध्ये विनाेदला संधी मिळाली आणि तिथे ताे 54-55च्या स्ट्राइक रेटने ताे खेळला. मॅचनंतर सचिन आणि मांजरेकरने त्याची शाळा घेतली. याने पाकिस्तानने टाइट बाेलिंग केली म्हणून स्लाे खेळलाे असं सांगून कशीबशी सुटका करून घेतली.