आज कामगार म्हणून काम करीत असलेला कर्मचारी हा उद्या बढती मिळवून पर्यवेक्षक किंवा अधिक वरच्या जागेवर जाऊ शकताे. त्यामुळे नेतृत्वविकासासाठीच्या प्रशिक्षणाचा उपयाेग हाेताे. या प्रशिक्षणामध्ये आपसामध्ये संवाद साधणे, आलेल्या अडचणींचे निराकरण करणे, अडचणी साेडविण्यासाठी पुढाकार घेणे, सहकाऱ्यांना बराेबर घेऊन काम करणे, कामाची नवीन तंत्रे शिकून घेण्यात रस दाखविणे इत्यादी गुण विकसित करण्यासाठी गटचर्चा, तसेच प्रात्यक्षिके याचा वापर केल्यास प्रशिक्षण प्रभावी हाेऊ शकेल.प्रशिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे तणावाचे व्यवस्थापन कसे करावे याचे दिलेले प्रशिक्षण, कामाचा किंवा इतर बाबींचा असलेला तणाव हे आजच्या जीवनाचा एक अविभाज्य अंग आहे.तणाव पूर्णपणे नाहीसा करणे हे जरी शक्यण नसले, तरी त्याचे व्यवस्थापन करून त्याचा सकारात्मक उपयाेग कसा करता येईल, याचे शास्त्रीय प्रशिक्षण दिले जाते.
अर्थात तणाव हा सर्वच थरातील कर्मचाऱ्यांना जाणवत असल्यामुळे यासंबंधीचे प्रशिक्षण सर्वांनाच आवश्यरक आहे. नेतृत्वविकास प्रशिक्षणाचा आणखी एक महत्त्वाचा घटक. म्हणजे कर्मचाऱ्यांचे एकमेकांशी असलेले संबंध हे साैहार्दाचे कसे ठेवावे आणि सांघिक काम कसे करावे याचे प्रशिक्षण दिल्यास कार्यक्षमता वाढण्यास मदत हाेते. यासाठी एकमेकांबराेबर संवाद साधण्याची कला, तसेच आपसातील संघर्षाचे व्यवस्थापन याचासुद्धा माेठ्या प्रमाणावर उपयाेग हाेताे.कंपनीची ध्येयधाेरणे, उद्देश, व्यवस्थापनाची साखळी, संचालक मंडळ इत्यादी बाबींची माहिती ही शेवटच्या स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत पाेचली पाहिजे, अन्यथा या कर्मचाऱ्यांना आपण करीत असलेल्या कामांचे महत्त्व समजणार नाही. त्यामुळे अशा प्रकारची माहिती कर्मचाऱ्यांना देणे अशा प्रशिक्षणामधून शक्या हाेते. आज ज्या विषयाची चर्चा सगळीकडे चालू आहे ताे म्हणजे आर्थिक साक्षरता कित्येक वेळा अगदी वरच्या पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनासुद्धा आर्थिक नियाेजन कसे करावे, गुंतवणूक कशी करावी, यासंबंधीची माहिती नसते. त्यामुळे विशेषत: कनिष्ठ पातळीवर काम करणारे कर्मचारी अनेक प्रकारच्या फसवणुकीस बळी पडतात.