जे कराल ते प्रामाणिकपणे करा

15 Nov 2024 22:25:56
 
 

thoughts 
नेहमी एक गाेष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे यश ही एक वृत्ती असते, घटना नसते. काेणतेही काम करत असताना सगळे लक्ष फ्नत अंतिम निकालावर असेल तर तुम्ही काम करू शकत नाही.फ्नत जे काम करत आहात त्यात तुम्ही प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने शंभर ट्नके द्या.असे केल्यास तुम्हाला त्या गाेष्टीत यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जितके द्याल तितक्या प्रमाणात त्याचे रिटर्न तुम्हाला काेणत्या ना काेणत्या स्वरूपात मिळत असतात. प्रत्येक धंद्यात आणि संस्थेत कसाेटीची परिस्थिती येत असते की जी हाताळायचे काैशल्य तुमच्यात असावे लागते. हे काैशल्य आपल्या आतून येते. शांतता आणि भरभराट या दाेन्ही गाेष्टी एकमेकांशी जाेडलेल्या असतात.अस्वस्थ वातावरणात भरभराट हाेऊ शकत नाही.
 
इतरांबराेबर काम करतानासुद्धा तुम्हाला संघभावनेने काम करावे लागतुमच्या गटातील सर्वांशी आदराची भावना ठेवा आणि इतरांवर खापर फाेडण्याच्या भानगडीत अडकू नका आणि आणखी एक म्हणजे गटाच्या नेत्याने उत्सवाचे, विश्वासाचे, सहकार्याचे आणि आपलेपणाचे वातावरण ठेवावे.सगळे लक्ष फक्त उत्पादन आणि निव्वळ नफा यावर असेल तर काहीच हाेणार नाही. लाेकांच्या मनात आतूनच स्फूर्ती निर्माण करणे हीच सर्वात परिणामकारक क्लुप्ती आहे. कर्माच्या फळामध्ये गुंतून न रहाणे हेच भगवद्गगीतेचे सार आहे. एखाद्या युद्धजन्य परिस्थितीत तुम्ही तुमच्या मनाला सावरू शकत असाल तर तुम्ही काेणत्याही परिस्थितीला सांभाळूनघेऊ शकता. कर्माच्या या काैशल्याला याेग म्हणतात.याेगाच्या या काैशल्यामुळेच उद्धटपणा-आत्मविश्वासात, लीनता-नम्रतेत, परावलंबित्वपरस्परावलंबनाची जाणीव हाेण्यात आणि मर्यादित मालकीची भावना पूर्णत्वात, एकत्वाची भावना निर्माण हाेण्यात परिवर्तित हाेते.
Powered By Sangraha 9.0