स्मार्ट काॅन्टॅ्नट लेन्स अश्रूंद्वारे र्नतातील साखरेची पातळी सांगतील

07 Oct 2024 12:37:50
 
 

Health 
 
अमेरिका, ब्रिटन आणि चीनच्या संशाेधकांनी एकत्रितपणे आगळ्या स्मार्ट काॅन्टॅ्नट लेन्स बनवल्या आहेत. यांचे वैशिष्ट्य हे आहे की, या लावल्यानंतर आपण डायबिटीस आणि हृदयासंबधित आजारांवर लक्ष ठेवू शकाल. या लेन्स अश्रूंच्या मदतीने शरीरातील ब्लड शुगरची पातळी चेक करतील व आपल्याला सावध करीत राहतील. लेन्स बनवणाऱ्या टीमचे सदस्य प्राे. यूनलाॅन्ग झाओ यांचे म्हणणे आहे की, या लेन्स डाेळ्यांची दृष्टी वाढवण्यासाेबत स्वत:ला सुदृढ ठेवण्यासही मदत करतात. लेन्स अश्रुंमधील ब्लड शुगर चेक करतात व चेक केल्यानंतर डेटा वायरलेस पद्धतीने काॅम्प्यूटरमध्ये ट्रान्स्फर करतात.यावरून डायबिटीस आणि हृदय राेगाचा धाेका किती आहे, हे पाहता येऊ शकते.
 
या रिसर्चमध्ये सामील हार्वर्ड विद्यापीठाचे प्राे शिकी गुओ म्हणतात की आम्ही ज्या लेन्स तयार केल्या आहेत त्या इतर स्मार्ट लेन्सच्या तुलनेत खूपच पातळ आहेत. दाेन लेन्समध्ये आम्ही एक सेन्सर व सर्किट लावलेले आहे. डाेळ्यांत असलेले फ्लुइड (द्रव पदार्थ ) या सेन्सरच्या संपर्कात येताे आणि आम्हाला नवी माहिती देताे. या लेन्समध्ये काही सेन्सर आणि मायक्राेचिप लावल्या आहेत. ज्या पापण्यांचा वेग ओळखून त्यानुसार आपले काम करतात. एवढे की, या लेन्स झूम इन व झूम आऊटचीही सुविधा देतील. रिसर्चनुसार, जर आपण एखादी वस्तू झूम करून पाहू इच्छित असाल तर त्यासाठी आपल्याला फ्नत एकदा पापणी लववावी लागेल. खास गाेष्ट म्हणजे लेन्समध्ये खूप गाेष्टी झाल्यानंतरही या आपल्याला कम्फर्टची जाणीव देतील.
 
इकडे अमेरिकेच्या कॅलिफाेर्नियाच्या स्टार्टअप माेजाे व्हिजनने घाेषणा केली आहे की, ते वर्षअखेरीपर्यंत आपल्या स्मार्ट काॅन्टॅ्नट लेन्सचा प्राेटाेटाइप बाजारात लाॅन्च करतील. या लेन्सची माहिती सीईएस 2020 मध्ये जारी केली गेली हाेती.या लेन्स वेळ, हवामानाचा अंदाज व कॅलेंडरही सांगतात.या स्मार्ट लेन्स कमकुवत नजर असणाऱ्यांसाठी उपयुक्त असतानाच राेबाेटिक डाेळ्यांप्रमाणेही काम करतील. संशाेधकांच्या मते यामध्ये नाइट व्हिजनची साेयही आहे. याच्या वापरासाठी स्मार्टफाेन वा काेणत्याही प्रकारच्या वेगळ्या डिव्हाइसची आवश्यकता नसेल. कारण यामध्ये बिल्ट इन डिस्प्ले आहे. यामध्ये नाइट व्हिजनची सुविधा, राेबाेटिक डाेळ्यांप्रमाणे काम करील.
Powered By Sangraha 9.0