पुनर्वसित इर्शाळवाडीला मुख्यमंत्र्यांची भेट

07 Oct 2024 12:24:14
 
 
 

CM 
 
इर्शाळवाडी दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. सिडकाेमार्फत या दरडग्रस्तांच्या 44 घरांचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि कामाचा आढावा घेतला. येत्या काही दिवसांत या घरांचा ताबा संबंधित कुटुंबांना देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.पुणे दाैरा आटाेपून मुंबईकडे जात असताना मुख्यमंत्र्यांनी इर्शाळवाडी पुनर्वसन कामाला अचानक भेट दिली. त्यांच्या समवेत खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थाेरवे, सिडकाेचे अधिकारी गणेश देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित हाेते.
 
खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत गेल्या वर्षी जुलैत रात्रीच्या सुमारास दरड काेसळून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली हाेती. अनेक जण मृत्युमुखी पडले. मुख्यमंत्र्यांनी इर्शाळवाडीलेट देऊन तात्काळ पुनर्वसनाचे आश्वासन येथील नागरिकांना दिले हाेते. जवळपास वर्षभरापासून सिडकाेच्या माध्यमातून चालू असलेले बांधकाम पूर्ण झाले असून, येथे 44 घरांची बांधणी करण्यात आली आहे.इर्शाळवाडीतील उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना सिडकाेच्या माध्यमातून नाेकरीवर घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी सिडकाेच्या अधिकाऱ्यांनादिले; तसेच उद्याेग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून येथील महिलांना उद्याेग उपलब्ध करून देण्याचेही कबूल केले. तसा फाेनही त्यांनी उद्याेगमंत्र्यांना केला असून, उद्याेग खात्याचे अधिकारी संबंधित गावाला भेट देऊन तेथील महिलांना राेजगार उपलब्ध करून देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0