पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या (पुणे) चिंचवड विभागाने वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांना दिवाळी भेटवस्तू व मिठाईचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी पुणे वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विजय पारगे, वरिष्ठ उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार व सर्व पदाधिकारी, विभागप्रमुख, संघटक, प्रेस माध्यम समूहाचे सर्व प्रतिनिधी, अधिकारी; तसेच विक्रेते बंधू आणि भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. या स्नेहमेळाव्यात अध्यक्ष विजय पारगे यांनी मार्गदर्शन करून सर्व विक्रेत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पथारी संघटनेचे नवनिर्वाचित पॅनलप्रमुख काशिनाथ नखाते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनीही विक्रेत्यांच्या कष्टाचे व कामाचे कौतुक करत स्टॉलधारकांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. चिंचवड विभागाचे हर्षद राव यांनी मनोगत व्यक्त केले. अनिल दळवी यांनी सूत्रसंचालन केले. चिंचवड विभागप्रमुख मनोज काकडे यांनी स्वागत केले. विश्वस्त राजकुमार ढमाले यांनी आभार मानले.