मुलांची अनावश्यक स्तुती नका

26 Oct 2024 23:31:39
 
 

thoughts 
 
मुलांना प्राेत्साहित केल्याने मुले एखादी गाेष्ट अधिक जाेमाने करतात; पण एखाद्या मुलामध्ये आत्मविश्वासाची कमतरता असेल आणि त्याची अतिर्नित स्तुती केल्यास ते मुलांसाठी हानिकारक ठरू शकते, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. नेदरलँडमधील युट्रेक्ट युनिव्हर्सिटीमध्ये मुलांच्या मानसशास्त्रावर केलेल्या संशाेधनात हे समाेर आले आहे.अनेकदा माेठी माणसे लहान मुलांची विनाकारण स्तुती करत असतात; पण ज्या मुलांकडे आत्मविश्वास असताे, त्या मुलांची स्तुती केल्यास त्याचा त्यांना फायदाच हाेताे.या स्तुतीमुळे ते एखादे कृत्य अधिक जाेमाने करतात.एखाद्या मुलाकडे मुळातच आत्मविश्वास कमी असेल तर या अवाजवी स्तुतीमुळे मुलांवर प्रचंड ताण निर्माण हाेताे.त्यामुळे माेठ्या माणसांकडून देण्यात आलेल्या नवनवीन आव्हानांचा सामना करताना त्यांची दमछाक हाेते.त्यामुळे ही अवाजवी स्तुती त्या मुलांसाठी घातक ठरू शकते, असे हे संशाेधन करणाऱ्या संशाेधकांच्या चमूने सांगितले. लहान मुलांची स्तुती करताना त्यामध्ये एका शब्दाचा फरक असताे.
 
या स्तुती करताना वापरण्यात येणारी क्रियाविशेषणे किंवा विशेषणे याचा परिणाम मुलांवर हाेत असताे. उदाहरणार्थ, एखाद्या मुलाला तू चांगला आहेस असे सांगितल्यास ती त्याची सर्वसाधारण स्तुती असते. तुम्ही त्याला तू अद्वितीय आहेस असे म्हटल्यास त्या मुलाची अतिरिक्त स्तुती केल्यासारखे हाेते. या संशाेधनामध्ये तीनपैकी दाेन मुलांचे पालक त्यांच्या मुलांची हुशार मुलांच्या तुलनेत अवाजवी स्तुती करत असल्याचे दिसून आले. संशाेधकांनी केलेल्या संशाेधनामध्ये 114 पालक (त्यामध्येही 88 ट्नके मुलांच्या माता) त्यांच्या मुलांसह सहभागी झाले हाेते. या वेळी केलेल्या निरीक्षणामध्ये मुलांना त्यांच्या घरी बारा पट अधिक गणित विषयाचा अभ्यास करण्यास सांगितल्याचे दिसून आले; पण प्रत्यक्षात मुलांना कमी गुण मिळाल्याचे दिसून आले. मुलांच्या घेण्यात आलेल्या परीक्षेच्या वेळी पालकांनी मुलांची सहा वेळा स्तुती केली. यामध्ये 25 ट्नके स्तुती ही अतिशयाे्नती हाेती, असे दिसून आले.या अतिशयाे्नतीमुळे मुलांच्या मनावर दडपण आल्याचे या संशाेधनात दिसून आले. हे संशाेधन सायकाॅलाॅजिकल सायन्सच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0